Thursday, May 2, 2024
Homeनगरगावठी कट्टे व जिवंत काडतुसे घेवून गावात फिरणार्‍यास अटक

गावठी कट्टे व जिवंत काडतुसे घेवून गावात फिरणार्‍यास अटक

सलाबतपूर ( वार्ताहर)-

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे दोन गावठी कट्टे व 11 जिवंत काडतुसे जवळ बाळगून गावात फिरुन दहशत निर्माण करणार्‍या

- Advertisement -

एका ज्येष्ठ नागरिकास नेवासा पोलिसांनी अटक केली असून त्याचा मुलगा पसार झाला.

याबाबत नेवासा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार दि. 29 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलीस नाईक राहुल यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सलाबतपूर येथील विलास काळे हा त्याच्या कमरेला गावठी कट्टा व जिवंत राऊंड घेवून गावात फिरत आहे.

सदर बातमीवरुन प्रभारी अधिकारी यांचेसह उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस नाईक राहुल यादव, महेश कचे, कॉन्स्टेबल अशोक कुदळे, गणेश इथापे, शाम गुंजाळ, सचिन गणगे व दोन पंच अशांनी सलाबतपूर गावात जावून छापा टाकुन विलास श्रीपती काळे (वय 65) रा. नजन वस्ती सलाबतपूर ता. नेवासा यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेता त्याच्याकडे 80 हजार रुपये किंमतीचे दोन गावठी कट्टे (पिस्तोल) तसेच साडेपाच हजार रुपये किंमतीची 11 जिवंत काडतुसे (राउंड) मिळून आले.

सदरचे पिस्तोल विलास श्रीपती काळे याचा मुलगा पाल्या विलास काळे याने खरेदी केलेबाबत तपासात निष्पन्न झाले.

सदर प्रकाराबाबत नेवासा पोलीस ठाण्यात विलास श्रीपती काळे व त्याचा मुलगा पाल्या विलास काळे (फरार) या दोघांवर गुन्हा रजिस्टर फर्स्ट 924/2020 आर्म अ‍ॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक भरत दाते व पोलीस नाईक संदीप गायकवाड करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या