Wednesday, September 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसरन्यायाधीश भूषण गवई यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत

जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश भूषण गवई यांचे आज सायकांळी 5.00 वाजता ओझर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी उच्च न्यायालय, मुंबईचे न्यायमुर्ती मकरंद कर्णिक, जिल्हा aव सत्र न्यायाधीश, नाशिक श्रीचंद जगमलानी, जिल्हा न्यायाधीश-1 ए. के. लाहोटी, जिल्हा न्यायाधीश-2 पी. एम. बदर यांनी तर प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनच्यावतीने ॲङ जयंत जायभावे, वकिल संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे, वरिष्ठ कोर्ट मॅनेजर अशोक दारके यांनीही सरन्यायाधीश गवई यांचे स्वागत केले.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभहस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व वाहनतळ इमारतीचा भुमीपूजन समारंभ शनिवार, 27 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता पोलीस कवायत मैदानावर होणार आहे.

ताज्या बातम्या

“जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या…”; उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

0
मुंबई । Mumbai मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा १२ वा दिवस उजाडला असतानाच, आता आंदोलनकर्ते आणि सरकारमधील राजकीय संघर्ष...