Friday, April 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"मोदीजी जर तुमची छाती…जर ट्रम्प करु शकता तर तुम्ही का नाही?"; ओवैसींची...

“मोदीजी जर तुमची छाती…जर ट्रम्प करु शकता तर तुम्ही का नाही?”; ओवैसींची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर कारवाई करत, तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेत अमेरिकेत आणले. या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून आता एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबईत एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. ट्रम्प यांनी त्यांचे सैन्य व्हेनेझुएलाला पाठवून तेथील राष्ट्रपतींना अमेरिकेत नेले हे आम्ही पाहिले. भारतही असेच काही करू शकतो, असे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. मोदींचा उल्लेख करत ओवैसी म्हणाले, “मोदीजी, आम्ही तुम्हाला सांगत आहोत की 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांची, मग तो मसूद अझहर असो किंवा लष्कर-ए-तोयबाचा क्रूर सैतान असो, जर तुमची छाती 56 इंचाची आहे, तर तुम्ही ते केले पाहिजे, त्यांना उचलून भारतात आणा. ट्रम्प करू शकतात तर तुम्ही कमी आहात का? ते करू शकतात, तर तुम्हाला करावेच लागेल, कारण तुम्हीच म्हणाला होता अब की बार ट्रम्प सरकार.

- Advertisement -

BMC Elections: उध्दव ठाकरेंची मोठी खेळी ! अपक्ष उमेदवाराला दिला पाठिंबा, नील सोमय्यांच्या बिनविरोध निवडीत अडथळा

भारताकडून ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी
व्हेनेझुएलातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता, भारत सरकारने शनिवारी (३ जानेवारी २०२६) रात्री उशिरा एक ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी केली आहे. यात, भारतीय नागरिकांनी व्हेनेझुएलामध्ये अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. तसेच तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीयांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याच्या आणि काराकस येथील भारतीय दूतावासच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

Shirdi : खरातच्या पत्नीचे परदेशात पळून जाण्याचे मार्ग बंद

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi भोंदूबाबा प्रकरणातील अटक आरोपींच्या तपासादरम्यान पतसंस्थांमधील आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून समता व जगदंबा नागरी सहकारी...