Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNIMA : 'निमा' अध्यक्षपदी आशिष नहार यांची बिनविरोध निवड

NIMA : ‘निमा’ अध्यक्षपदी आशिष नहार यांची बिनविरोध निवड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

निमाच्या अध्यक्षपदाची सूत्रे गेल्या दोन वर्षांपासून धनंजय बेळेे यांच्याकडे होती. 31 डिसेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर पदाधिकार्‍यांची निवड मात्र झालेली नव्हती. यासाठी सदस्यांच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.7) घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये निमाच्या 53 व्या अध्यक्षपदी आशिष नहार यांची एकमताने निवड करण्यात आली.

- Advertisement -

निमा निवडणूक वादातून धर्मादाय आयुक्तांनी प्रशासकाची नेमणूक केली होती. सुमारे तीन ते चार वर्षे प्रशासकाने निमाचा कारभार पाहिला. शेवटी-23 साठी स्टेरिंग कमिटी स्थापन करून त्यांच्याकडे निमाचा कारभार सोपविण्यात आला. त्यानुसार गेले दोन वर्ष धनंजय बेळे यांनी अध्यक्षपदावर निमाचा कारभार पाहिला. त्या कार्यकारिणीत आशिष नहार हे सिन्नरचे उपाध्यक्ष होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

दि.31 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात येते. त्यानुसार या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली.अध्यक्षपदाची निवड प्रलंबित होती.त्यानुसार काल कार्यकारणी सदस्यांची बैठक घेण्यात आली. त्यात विद्यमान अध्यक्ष धनंजय बेळे यांनी आशिष नहार याच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. सर्व सदस्यांनी त्याला मंजुरी दिल्याने सर्वानुमते अध्यक्षपदाची सूत्रे आशिष नहार यांना बहाल करण्यात आली. लवकरच आशिष नहार त्यांच्या कार्यकारी मंडळाची घोषणा करणार आहेत.

माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत पदग्रहण
या बैठकीनंतर सर्व माजी अध्यक्षांनी आशिष नहार यांच्या निवडीचे स्वागत केले व त्यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीत स्थानापन्न केले. यावेळी निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, महेंद्र कोठारी, रमेश वैश्य, मधुकर ब्राह्मणकर, नरेंद्र हिरावत, मनीष कोठारी, अभय कुलकर्णी आदींसह पदाधिकार्‍यांनी आशिष नहार यांचे अभिनंदन केले.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दावोस येथे जाऊन आणलेल्या गुंतवणुकीतून नाशिक जिल्ह्यासाठी गुंतवणूक आलेली नाही. भविष्यात नाशिकला मोठ्या गुंतवणूक येण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित काम करण्याची गरज असून, निमाला यापूर्वी दिलेल्या गत वैभवाला आणखी झळाळी देण्याचे काम नूतन अध्यक्ष करतील असा विश्वास माजी अध्यक्ष रमेश वैश्य यांनी व्यक्त केला.

अध्यक्षांच्या निवडीनंतर आयमाचे माजी अध्यक्ष वरूण तलवार, निखिल पांचाळ, ज्ञानेश्वर गोपाळे, मिलिंद राजपूत, कैलास आहेर, बाळासाहेब गुंजाळ, जयंत जोगळेकर, अनिल मंत्री आदींसह उद्योजकांनी आशिष नहार यांचे अभिनंदन केले.

जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध : नहार
उद्योगांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राचा विकास करण्यासाठी सातत्याने आपण काम करणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री नाशिकचे सिंहस्थमंत्री व सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राच्या प्रश्नांची तड लावू आणि विकासासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत. आगामी काळात दावोस सारख्या बैठकांमध्ये निमाचा प्रतिनिधी मंडळ देखिल सहभागी राहील. या दृष्टीने देखील आपण प्रयास करणार असल्याचा विश्वास नूतन अध्यक्ष आशिष नहार यांनी व्यक्त केला.

सिन्नरला तिसरा बहुमान
नाशिकचे खा. राजाभाऊ वाजे हे सिन्नरमधून आलेले आहेत. नाशिकचे आमदार व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे देखील सिन्नरचे आहेत. आता उद्योग क्षेत्राचे अध्यक्षपदी देखील आशिष नहार यांची निवड करण्यात आली. हे देखील सिन्नर औद्योगिक वसाहतीतून आलेले आहेत. नाशिकच्या निमाचे अध्यक्षपदी यापूर्वी सिन्नरचे नरेंद्र हिरावत हे होते. आशिष नहार हे दुसरे उद्योजक सिन्नर येथून अध्यक्षपदावर विराजमान होत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...