Wednesday, May 20, 2026
HomeनाशिकAshok Kharat Case : माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून खरातचा सुनील...

Ashok Kharat Case : माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून खरातचा सुनील तटकरेंना फोन; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदू अशोक खरातचे (Ashok Kharat) दररोज नवनवे कारनामे उघड होत आहेत. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होत आहे. खरात प्रकरणामुळे अनेक राजकीय नेते देखील अडचणीत आले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना या प्रकरणात राज्य महिला आयोग आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ज्या कार्यालयात महिलांसोबत करायचा अश्लील चाळे SIT ने तेच केले सील; लिंगपिसाट खरातला दणका

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) भोंदू अशोक खरात याने माणिकराव कोकाटे यांना मंत्री करू नये म्हणून सुनील तटकरे यांना फोन केले होते. माणिकराव कोकाटे हे सिन्नरचे अनेक वर्षे आमदार असून, त्यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती समोर आणली पाहिजे. सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर यांना तात्काळ सहआरोपी केले पाहिजे. त्यांचे व्यवहार तपासले पाहिजेत. कारण अशोक खरात एकटा नसून त्याची मोठी टीम होती म्हणूनच आजपर्यंत त्याचे अनेक कारनामे दडपलेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे फोटो अशोक खरात , ऋषिकेश वैद्य अशा भोंदू व बलात्कारी बाबांच्या सोबत आहेत. इतर अनेकजण सत्ताधारी पक्षाचे मोठे नेते अडकलेले आहेत. त्यामुळे आता सीएमओ महाराष्ट्र ठरवतील कोणत्या गुन्ह्यांमध्ये कोणाला आरोपी करायचं की नाही करायचं, असे विकास लवांडे यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : Nashik MHADA Fraud : बिल्डर लॉबीला दणका! माजी स्थायी समिती सभापतीसह बड्या असामींचे जामीन अर्ज फेटाळले

मंत्री भरणे यांनी आधी केली पाठराखण नंतर सूर बदलला

भोंदू अशोक खरात प्रकरणात जेव्हा पहिल्यांदा रुपाली चाकणकर यांचे नाव आले तेव्हा राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी त्यांची पाठराखण केली होती. मात्र, आता त्यांनी “आम्ही कुठलाही महाराज आणि बुवाबाजीच्या विरोधात असतो. अजितदादांनी आम्हाला तशी शिकवण दिली आहे. आम्ही भोंदूबाबांना कधी जवळ केले नाही. अशोक खरात कोण आहे, हे मला माहिती नव्हते. या लोकांना ठोकून काढले पाहिजे. जेणेकरुन इतर कोणताही महाराज असे कृत्य करणार नाही. हे महाराज लोकांना फसवतात, नादी लावतात. काही लोक त्यांचा प्रचार करतात. पण खरात भोंदूबाबा आहे. मला माहिती नव्हतं तो कसा आहे, मी सहज बोलून गेलो होतो, असे स्पष्टीकरण दत्तात्रय भरणे यांनी दिले. तसेच खरात अत्यंत चुकीचा माणूस असून त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मी खरात याची बाजू कधीच घेणार नाही. राज्यात अंधश्रद्धा कायद्याचा वापर होत नाही. आता या प्रकरणातून शिकायला मिळेल. आता तरी या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा :  Ashok Kharat Crime News : खरातच्या ‘कुकर्मा’ मागे राजकीय वरदहस्त? रुपाली चाकणकरांवर ‘सेटलमेंटचा’ आरोप!

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : खरातचा ताबा ईडीकडे; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेची...

0
मुंबई | Mumbai लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्वयंघोषित भोंदू अशोक खरातला (Ashok Kharat) विशेष पीएमएलए न्यायालयाने (PMLA Court) मंगळवारी मोठा दणका दिला. ७०...