Wednesday, April 29, 2026
HomeनाशिकNashik MHADA Fraud : बिल्डर लॉबीला दणका! माजी स्थायी समिती सभापतीसह बड्या...

Nashik MHADA Fraud : बिल्डर लॉबीला दणका! माजी स्थायी समिती सभापतीसह बड्या असामींचे जामीन अर्ज फेटाळले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बहुचर्चित म्हाडा जमीन फसवणूक घोटाळ्यात (MHADA Land Fraud) अटकपूर्व जामीनासाठी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात (Nashik Sessions Court) धाव घेतलेल्या बिल्डरांसह विकासक आणि जमीन मालकांना धक्का बसला आहे. या घोटाळ्यातील काही संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी (दि. २७) नाशिक न्यायालयाने फेटाळले आहेत. त्यामध्ये बिल्डरांसह एका माजी स्थायी समिती सभापतीचाही समावेश आहे. उर्वरित संशयीतांचेही अर्ज फेटाळले जाण्याची शक्यता असून, अनेकांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ज्या कार्यालयात महिलांसोबत करायचा अश्लील चाळे SIT ने तेच केले सील; लिंगपिसाट खरातला दणका

नाशिकमधील म्हाडाच्या जमिनींवरील आरक्षणात झालेल्या पोलिसांचा (Police) बनावटगिरीबाबत सखोल तपास सुरू आहे. याप्रकरणी १६ मार्च रोजी पहिला संशयित दिनेश उर्फ सोनू कन्हैय्यालाल मनमानी याला अटक झाली. तर २३ मार्च रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन चंद्रकांत काजळे यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत (Sarkarwada Police) गुन्हा नोंद आहे. त्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एक करीत असून, संशयितांमध्ये जमीन मालक, प्रकल्प विकासक, बांधकाम व्यावसायिकांसह अज्ञातांचा समावेश आहे.

हे देखील वाचा :  Ashok Kharat Crime News : खरातच्या ‘कुकर्मा’ मागे राजकीय वरदहस्त? रुपाली चाकणकरांवर ‘सेटलमेंटचा’ आरोप!

संशयितांनी संगनमताने म्हाडा, महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभागाची फसवणूक (Fraud) केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या गुन्ह्यातील संशयितांमध्ये नाशिकमधील अनेक नामांकित बिल्डरांची नावे आहेत. काही भूखंडात एकापेक्षा जास्त किंबहुना दहापर्यंत भागीदार आहेत. त्यामुळे संबंधित ‘बिल्डर लॉबी’ महिन्याभरापासून अटक टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अखेरीस न्यायालयीन आदेशामुळे त्यांना धक्का बसल असून, अनेकजण शहरातू पसार झाले आहेत.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : मंत्रालयाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये खोल्या कायमच्या बुक, ‘वर्षा’वर खास पूजेची चर्चा; खरातसाठी माजी मुख्यमंत्र्यांकडून विशेष खातीरदारी

याचे जामीन फेटाळले

म्हाडा घोटाळ्यातील संशयित विक्रम दिग्विजय कपाडिया, गणेश बबन गिते, अभिषेक नरेंद्र ठक्कर, राहुल जयप्रकाश लुणावत, अमीर दिनेश कुवाड, आशा चंद्रकांत बनकर, सचिन रमाकांत वाघमारे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी (दि. २७) सुनावणीअंती नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळले. हे सर्वजण मुंबई उच्च न्यायालयात बचावासाठी धाव घेण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी नाशिक पोलीस संबंधितांना अटक करणार की, कायदेशीर पळवाट शोधण्यासाठी ‘मुभा’ मिळणार याकडे राज्याचे लक्ष आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : “अवतार पूजा केली नाही तर मृत्यू होईल, हातातील तांदूळ सांडले तर नाग डसेल”; भोंदू खरातने बांधकाम व्यावसायिकास भीती घालून मर्सिडीज लांबविली

ताज्या बातम्या

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच...