Thursday, May 14, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : चाकणकर-खरात कनेक्शनचा पंचनामा; SIT कडून सहा तासांच्या चौकशीत...

Ashok Kharat Case : चाकणकर-खरात कनेक्शनचा पंचनामा; SIT कडून सहा तासांच्या चौकशीत प्रश्नांचा भडिमार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या ‘शिवनिका संस्थान’मध्ये महत्त्वाचे पद भूषवणाऱ्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची रविवारी विशेष तपास पथकाने तब्बल साडेपाच तास कसून चौकशी केली. या चौकशीत ५० हून अधिक प्रश्नांचा भडिमार करण्यात आला असून, खरातच्या आर्थिक साम्राज्यात चाकणकरांचे नक्की स्थान काय, यावर एसआयटीने लक्ष केंद्रित केले आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्याचे कारण देत चौकशी टाळणाऱ्या रुपाली चाकणकर अखेर रविवारी दुपारी १२:३० वाजता एमपीएमधील एसआयटी कार्यालयात (SIT Office) हजर झाल्या. यावेळी त्यांनी कायदेशीर संरक्षणासाठी महिला बकिलांची फौजही सोबत आणली होती. मात्र, एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, किरणकुमार सूर्यवंशी यांनी फक्त चाकणकरांनाच प्रवेश देऊन चौकशी केली. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत चाललेल्या या प्रदीर्घ चौकशीत खरातसोबतचे आर्थिक व्यवहार, सामाजिक उपक्रमांमधील सहभाग आणि त्यांच्यातील संवादाचे स्वरूप यानुसार धारदार प्रश्न विचारण्यात आले.

खरात याने जादूटोणा आणि महिलांवरील अत्याचाराच्या माध्यमातून कमावलेला पैसा (Money) राजकीय वरदहस्ताने पांढरा केला का, याचा तपास आता अंतिम टप्प्यात आहे. चाकणकर यांच्या भगिनीची ‘समता पतसंस्थेतील’ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी झालेली चौकशी आणि आता स्वतः चाकणकर यांची झालेली चौकशी, यामुळे हे प्रकरण केवळ भोंदू‌गिरीपुरते मर्यादित नसून यात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे (Financial Malfeasance) संकेत मिळत आहेत.

नेमके प्रकरण काय

१८ मार्च रोजी खरातविरुद्ध नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत (Sarkarwada Police) पहिला गुन्हा नोंद झाल्यावर राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांतील फोटो व्हायरल झाले. आरोप-प्रत्यारोपानंतर चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून त्यांच्या चौकशीची मागणी सुरू होती. त्यानुसार विशेष तपास पथकाने चाकणकर यांना नोटीस देत चौकशीसाठी नाशिकमध्ये बोलावले. रविवारी (दि. १०) पुणे येथून चाकणकर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये पोहोचल्या. खरालविरुद्ध एकूण अठरा गुन्हे नोंद असले तरी त्यापैकी लैंगिक अत्याचाराचे आठ आणि फसवणुकीचा एक गुन्हा ‘एसआयटी’कडे तपासाकरीता आहे.

आजी-माजी पदाधिकारी फेऱ्यात

केवळ चाकणकरच नव्हे, तर मिरगावातील शिवनिका संस्थानचे इतर बड़े मासेही आता एसआयटीच्या जाळ्यात अडकले आहेत. यात नामकर्ण आवारे, ललित पोफळे, डॉ. नंदकिशोर कातोरे यांच्यासह इतर पदाधिकायांवर अटकेची टांगती तलवार आहे. या सर्वांनी आपल्या पदाचा वापर करून खरातच्या बेकायदेशीर कृत्यांना संरक्षण दिले होते का, याचा तपास सुरू आहे.

पुन्हा होणार हजेरी

  • खरातवर गुन्हा दाखल होऊन आता आरोपपत्र दाखल करण्यास केवळ पाच दिवस (१५ में) शिल्लक आहेत. त्यापूर्वी चाकणकरांची ही चौकशी अत्यंत कळीची मानली जात आहे.
  • खरातविरोधात महिला आयोगाकडे काही तक्रारी आल्या होत्या का आणि त्या राजकीय दबावापोटी दडपल्या गेल्या का, या अँगलनेही चौकशी.
  • सहा तासांच्या चौकशीनंतर चाकणकर बाहेर पडल्या. त्यांना पुन्हा दोन चार दिवसांत पाचारण केले जाणार आहे.

‘एसआयटी’च्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली आहेत. सगळ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. तपास पूर्ण झाल्यावर संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळतील. कोण काय म्हटले, याबाबत कल्पना नाही.

रूपाली चाकणकर, माजी अध्यक्षा, राज्य महिला आयोग

या प्रश्नांनुसार चौकशी

  • संशयित खरातला केव्हापासून ओळखतात
  • संशयित खरातसोबत आर्थिक व्यवहार होते का? कसे?
  • खरातच्या शिवनिका संस्थानवर विश्वस्त पदावर नियुक्ती कशी आणि का झाली.
  • शिवनिका संस्थांच्या बैठकांवेळी आर्थिक गैख्यवहारांचे मुद्दे सनोर आले होते का
  • खरातसोबत धार्मिक व समाजिक कार्यक्रमांत सहभाग होता, त्यामागील कारणे काय
  • खरातसोबत केलेल्या धार्मिक पूजाविधी मागील कारणे काय
  • खरातकडे जाणारे इतर नेते, पदाधिकारी यांना सल्ला कोण द्यायचं
  • खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांसह त्याच्या कुक्नीबाबत माहिती होती का?
  • आयोगाकडे आलेल्या महिला तक्रारदारांच्या अर्जावर, तक्रारींवर
  • कोणती कारवाई किंवा कार्यवाही झाली

ताज्या बातम्या

Nashik Crime News : एटीएसची झाडाझडती! राज्यात नाशिकसह चाळीस ठिकाणी छापे;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पाकिस्तानातील (Pakistan) लाहोरचा (Lahor) कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या सिंडिकेटशी संबंधित संशयास्पद संपर्कांवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी पहाटेपासून राज्यासह नाशिक...