Wednesday, October 21, 2026
Homeनाशिकदसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल; सोने-चांदीसह ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि रिअल इस्टेटमध्ये उत्साह

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल; सोने-चांदीसह ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि रिअल इस्टेटमध्ये उत्साह

नाशिक | प्रतिनिधी
साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानल्या जाणाऱ्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या सणानिमित्त शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. नवरात्रोत्सवापासूनच सुरू झालेल्या उत्साहाचा आज दसऱ्याच्या दिवशी परमोच्च बिंदू गाठला गेला असून, सराफ बाजार, ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट तसेच इलेक्ट्रॉनिक्सच्या दालनांमध्ये ग्राहकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. दिवसभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याने नाशिकच्या व्यापारी जगतात समाधानाचे व आनंदाचे वाता वरण पसरले आहे.

सराफ बाजारात दसऱ्यानिमित्त सोन्या-चांदीच्या खरेदीला जोरदार प्रतिसाद मिळाला. मागील काही दिवसांत १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत गेलेले भाव १ लाख ४४ हजार ते १ लाख ४५ हजार रुपयांच्या आसपास स्थिरावल्याने किंवा काही प्रमाणात घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. परिणामी, लग्नसराईच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली.

- Advertisement -

तसेच जुने दागिने मोडून नवीन फॅशनेबल दागिने घेण्याचा नवा ट्रेंडही या हंगामात मोठ्या प्रमाणात दिसून आला. चांदीचा भाव २ लाख १० हजार रुपये प्रति किलोच्या आसपास राहिला असून चांदीच्या दागिन्यांना व नाण्यांनाही चांगली मागणी राहिली. आगामी काळात आणि दिवाळीपर्यंत सोन्या-चांदीच्या भावात आणखी तेजी येण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी वर्तवली आहे.

…तर भविष्यात बिश्नोईच्या नावाने राजकीय नेत्यांच्या हत्या होतील, राऊतांचा खळबळजनक दावा

दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वाहन घरी आणण्याची परंपरा नाशिककरांनी यंदाही मोठ्या उत्साहात जपली. शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूम्समध्ये सकाळपासूनच चाव्या घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. गेल्या काही दिवसांत नोंदणी झालेल्या हजारो वाहनांची डिलिव्हरी आज देण्यात आली. यात विशेषतः इलेक्ट्रिक वाहने आणि एसयूव्ही प्रकारातील चारचाकी गाड्यांना नाशिककरांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील ग्राहकांचाही ऑटोमोबाईल खरेदीत मोठा सहभाग राहिला.

शुभ मुहूर्तावर स्वतःचे घर असावे या इच्छेतून नाशिकमधील बांधकाम क्षेत्रातही मोठी उलाढाल नोंदवली गेली. गंगापूर रोड, गोविंद नगर, पाथर्डी फाटा आणि इंदिरानगर परिसरातील विविध गृहप्रकल्पांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर नवीन फ्लॅट्सचे बुकिंग तसेच गृहप्रवेश पार पडले. विकासकांनी दसऱ्यानिमित्त दिलेल्या विशेष सवलती, स्टॅम्प ड्युटीतील सूट आणि आकर्षक भेटवस्तूंच्या योजनांमुळे गृहखरेदीला चांगलाच वेग आला.

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रीचे ९ दिवस आणि आजच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात १०० पेक्षा जास्त नवीन बुकिंग्स, ५५ पेक्षा जास्त गृहप्रवेश, आणि १२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे. ग्राहकांचा ह उदंड प्रतिसाद नाशिकच्या गृहनिर्माण क्षेत्रावरील दृढ विश्वास आणि शहराच वाढता विकास दर्शवतो.
गौरव ठवकर, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो

शुभ गुडूर्तावर घर घेण्याची परंपरा नाशिककरांनी यंदाह गोल्या उत्साहात जपली आहे. गागील काही महिन्यांच्या तुलनेत यंदा नवरात्र आणि दसऱ्याच्या काळात गृहप्रकल्पांच्या चौकशीत गणि प्रत्यक्ष बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ पहायला मिळाली. नाशिकमधील वाढत्या पायाभूत अनाथ सकारात्मक उत्साह आगामी दिवालीच्या काळातही कायम राहील असा विश्वास वाटतो.
राकेश अमृतकर, संचालक, पवनपुत्र डेव्हलपर्स

सोन्याच्या भावात चढ-उतार असले तरी ग्राहकांचा सोन्यातील गुंतवणुकीवर आणि परंपरेवरा विश्वात आजही
व्ययग आहे. दसचाच्या गुहूर्तावर वरंपरिक दागिन्यं सोबतच हलक्या रोजाय वापरासाठीच्या दागिन्यांना तरुणाईकडून नोटी पसंती मिळाली, याशिवाय अनेकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणूण सोन्याची व चांदीची नाणी खरेदी करण्यावर भर दिला.
सुशील अष्टेकर, संचालक, अष्टेकर अँड सन्स

नकरात्र आणि दसऱ्याच्या हंगामात दागिन्यांना ग्राहकांकভুল प्रचंड मागणी राहिली आहे. सोन्याचे भाव काहीसे
स्थिरावल्याने आगामी लमसराईसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. शिवाय, जुने दागिने देऊन नवीन डिझाईनचे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओघ वाढला आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा गाव १ लाख ४५ हजार ५०० रुपयांच्या आसपास राहिला, सोन्या-चांदीचे नाव सध्या ज्या पातळीवर आहेत, ते पाहता दिवाळीतही बाजारात असाच खरेदीचा उत्साह कायम राहील,
मयूर शहाणे, संचालक, मयूर अलंकार

ताज्या बातम्या