Tuesday, April 28, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : 'क्राइम सीन' रिक्रिएट; भोंदू खरातच्या कार्यालयातील झाडाझडतीत SIT...

Ashok Kharat Case : ‘क्राइम सीन’ रिक्रिएट; भोंदू खरातच्या कार्यालयातील झाडाझडतीत SIT ला काय-काय मिळालं?

एसआयटीकडून ओकसमध्ये पिडितेसमक्ष तपास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथकाने सोमवारी (दि.३०) कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात फॉरेन्सिक पथकासह पुन्हा तपासणी केली. शिवाय एका पीडित महिलेला सोबत घेऊन घडलेल्या गुन्ह्याचा (Crime) थरार पुन्हा उभा करत (सीन रिक्रिएशन) तपासाची चक्रे वेगाने फिरविली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना खरात प्रकरणात अद्याप SIT ची नोटीसच नाही! चौकशीच्या केवळ चर्चाच

पीडितेने नोंदवलेल्या फिर्यादीनुसार व तपासाचा भाग म्हणून एसआयटीने (SIT) कार्यालयाची पुर्नतपासणी केली. खरात याने पिडितेवर ताबा मिळवण्यासाठी नेमकी कोणती पद्धत वापरली, याचे संविस्तर चित्रण यावेळी करण्यात आले. त्याने पीडितेस कार्यालयात कसे बोलावले आणि सुरुवातीला काय संवाद साधला, याची माहिती घेण्यात आली. खरातने विशिष्ट मंत्र म्हणून पिडितेवर मानसिक नियंत्रण मिळवल्याचा आरोप असल्याने हे मंत्र तंत्र म्हणतानाची त्याची कृती आणि पिडितेची तत्कालीन स्थिती याचे निरीक्षण तपास पथकाने नोंदवले. पिडितेची शुद्ध हरपण्यासाठी किंवा तिला संमोहित करण्यासाठी तिला काही विशिष्ट पदार्थ खायला किंवा प्यायला कसे दिले होते, आदींसह बाबींचा सखोल तपास एसआयटीने करुन काही नोंदी पंचनाम्यात नमूद केल्या आहेत.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातच्या मोबाईलचा ‘क्लोन’ तयार; बड्यांची गुपिते उघडणार, पंटरही रडारवर

दोन हजार ‘अनोळखी’ नंबर्सचे गूढ

खरातच्या जप्त करण्यात आलेल्या मोबाईलने तपासाला नवीन दिशा मिळाली आहे. त्याच्या मोबाईलमध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक संशयास्पद नंबर आढळून आले असून, ते कोणत्याही नावाशिवाय (अनोळखी) सेव्ह आहेत. या क्रमांकांचा वापर कोणाशी संवाद साधण्यासाठी केला जात होता? यात आणखी काही महिलांची फसवणूक झाली आहे का? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी (Police) या मोबाईलची ‘क्लोन कॉपी’ तयार केली असून सायबर तज्ज्ञांची मदत घेतली आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडी पुन्हा वाढवली, आज कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा A टू Z माहिती

महत्त्वाचे दस्तऐवज हस्तगत

कार्यालयाच्या झडतीदरम्यान एसआयटीला काही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. ही कागदपत्रे खरातच्या संशयास्पद व्यवहारांशी किंवा पीडितांच्या माहितीशी संबंधित असावीत, असा अंदाज आहे. या कागदपत्रांची स्थानिक पातळीवर पडताळणी केल्यानंतर ती पुढील तांत्रिक विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात येणार आहेत. यातून खरातच्या संपर्कात असलेले अन्य बडे मासेही आता रडारवर येण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ‘नो चेक, ओन्ली कॅश’; नाशिकचा ‘एप्स्टीन’ खरातला धनादेशावर अविश्वास

ताज्या बातम्या

IPL 2026 : राजस्थानसमोर पंजाबचे आव्हान; कोण मारणार बाजी?

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये यंदाच्या हंगामात अपराजित राहिलेल्या पंजाब किंग्ज समोर मंगळवारी (दि. २८) राजस्थान रॉयल्सचे आव्हान...