नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या दुष्कर्म प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) विशेष तपास पथकासमोर हजर होणार असल्याच्या चर्चांनी सोमवारी नाशिकमध्ये (Nashik) दिवसभर जोर धरला. मात्र, प्रत्यक्षात चाकणकर हजर न झाल्याने या चर्चा केवळ तर्क-वितर्कच ठरल्या. शिवाय एसआयटीने अद्याप कुणालाही नोटीस किंवा समन्स बजावले नसल्याने चाकणकर हजर राहतीलच कशा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : नीलम गोऱ्हे देखील खरातला भेटल्या, नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेलमध्ये…; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ
अशोक खरातवरील गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर एसआयटीकडून (SIT) कसून तपास सुरू आहे. या तपासाच्या अनुषंगाने रूपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आल्याचे निराधार वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते. मात्र, एसआयटीसह पोलिसांनी (Police) या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबईतून या प्रकरणावर खळबळजनक भाष्य केले.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडी पुन्हा वाढवली, आज कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा A टू Z माहिती
दरम्यान, दमानिया यांनी थेट आरोप केला की, रूपाली चाकणकर यांना अधिकृतपणे समन्स बजावण्यात आले आहे. मात्र, चौकशीला सामोरे जाणे टाळण्यासाठी त्या कारणे देत आहेत. दमानियांच्या या विधानामुळे या प्रकरणातील संशयाची सुई अधिक गडद झाली आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातच्या मोबाईलचा ‘क्लोन’ तयार; बड्यांची गुपिते उघडणार, पंटरही रडारवर
रुपाली चाकणकर संशयाच्या भोवऱ्यात का?
भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचे बड्या राजकीय नेत्यांसोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचेही फोटो समोर आले होते. या फोटोंमध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातचे पाद्यपूजन करताना आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरताना दिसून आल्या होत्या. तसेच त्या अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिराच्या ट्रस्टवर सदस्य असल्याचे पोस्टर समोर आले होते. यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. अखेर त्यांना महिला आयोगाचा आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता . खरात प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात आल्याने रुपाली चाकणकर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांना एसआयटी नोटीस पाठवू शकते. पंरतु अद्याप एसआयटी किंवा पोलिसांकडून चाकणकर यांना नोटीस पाठविण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ‘नो चेक, ओन्ली कॅश’; नाशिकचा ‘एप्स्टीन’ खरातला धनादेशावर अविश्वास





