नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या ओकस कार्यालयावर एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. पंचांच्या समक्ष कार्यालयाला सील करत टाळं ठोकण्यात आलं आहे. एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमने कार्यालयाची सखोल पाहणी केली असून तपासाला वेग दिला आहे. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने कार्यालयातून प्रिंटर आणि महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दैवी शक्तीचा खोटा आव आणून आणि ‘मृत्यूची भीती’ दाखवून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना तब्बल ८ ते ९ कोटी कोटी रुपयांना लुटणाऱ्या अशोककुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ या भोंदूबाबाचा खरा चेहरा आता समोर आला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीसह जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला असून, या भोंदूने जासूद यांना चक्क २१ देशांत फिरवून त्यांच्याच पेशावर स्वतःची ‘मजा’ केल्याचे उघड झाले आहे.
देशात कोरोनासारखे पुन्हा लॉकडाऊन लागणार? केंद्रीय मंत्र्यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “देशात लॉकडाऊन…”
फिर्यादी राजेंद्र अशोक जासूद यांना लॉजिस्टिक व्यवसायात भरभराट हवी होती. याचाच फायदा घेत खरातने त्यांना ‘अवतार पूजे’च्या जाळ्यात ओढले. तुला २१ देशांत जाऊन तेथील मातीला स्पर्श करावा लागेल. अन्यथा, नागदेवता तुला डसून मारून टाकेल, अशी भीती खरातने घातली होती. या दहशतीखाली जासूदने खरातला अनेक देशांत नेले. विशेष म्हणजे, या सर्व प्रवासाचा, राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा शाही खर्च जासूद यांनी केला. २०१८-१९ मध्ये खरातने म्यानमार आणि ग्रीनलैंड या देशांची वारी केली. ग्रीनलँडमध्ये असताना तर त्याने ईश्वरी संकेत मिळत असून मी आता स्वर्गात जाणार असे नाटक करून जासूद यांना अधिकच भावनिक जाळ्यात ओढले. जून २०१८ ते २०२५ मध्ये हे प्रकार घडले.
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने खरातविरोधातील प्रत्येक तक्रार पडताळून घेतली जात आहे. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांत गुन्हे नोंदविले जात आहेत. दुसरीकडे एसआयटीच्या प्रमुख व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशाने पोलीस उपअधिक्षक किरणकु मार सूर्यवंशी, वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे हे पुरावे संकलन करत आहेत.
मोयो क्लिनिकमध्ये उपचार
खरातने स्वतःच्या उपचारांसाठी जासूद यांना अमेरिकेला नेण्यास भाग पाडले. फ्लोरिडातील मोयो क्लिनिकमध्ये हातापायच्या उपचारासाठी हॉस्पिटलायझेशनचा खर्चही उकळला. स्वतःला देव आहे. असे भासवून त्यांची कोट्यवधींची लूट करून फायदा करुन घेतला.
फुकटात फिरला हे देश
युगांडा, इजिप्त, आयलैंड, श्रीलंका, कंबोडिया आणि बंगलादेश अशा देशांमध्ये फिरून त्याने जासूद यांच्या पैशावर आंतरराष्ट्रीय पर्यटन केले दरम्यान, जासूद यांनी जेव्हा खरातवर पाळत ठेवली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. खरात हा भाविक येण्यापूर्वीच प्लास्टिकचा बनावट साप आणि काळी पिशवी वापरून ‘चमत्कार’ घडवत असल्याचे दिसून आले. ज्या नागाच्या भीतीपोटी जासूद यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले, ते प्लास्टिकचे खेळणे निघाले, प्लास्टिकचा हा नागही जप्त करण्याची कार्यवाही सुरु आहे.
लुटलेल्या मजेचा आणि खर्चाचा तपशील खर्चाचा तपशील अंदाजे रक्कम (रु.)
मर्सिडीज बेंन्झ कार (एमएच १५ जीएल ८१८१) १० लाख
अमेरिकेतील औषधोपचार खर्च २९ लाख ८१ हजार
मिरगाव फार्महाऊस बांधकाम १ कोटी ११ लाख
तुर्कस्थानवरून मागवलेले फर्निचर ९० लाख
सागवान लाकूड आणि किचन साहित्य ७१ लाख ५० हजार
उकळलेली खंडणी रक्कम ५ कोटी
एकूण ८ कोटी ९२ लाख




