नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महिला भक्तांचे लैंगिक शोषण व कोट्यवधींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) आता केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाने (आयटी) खरातच्या ५ ते ६ मालमत्तांवर एकाच वेळी धाड टाकत कारवाई केली. मुलाने दिलेल्या एका धक्कादायक कबुलीमुळे आता या प्रकरणाची व्याप्ती ‘बड्या धेंडांपर्यंत’ पोहोचण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचा काळाबाजार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग ताब्यात
सोमवारी (दि. १३) सूर्योदयापूर्वीच तपास यंत्रणांची पथके कर्मयोगीनगरमधील खरात यांच्या ‘तृप्तबाला’ निवासस्थानी धडकली. अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश करून खरात यांचा मुलगा हर्षवर्धन याला झोपेतून उठवत चौकशीचा फेरा सुरू केला. खरात यांची पत्नी सध्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये परागंदा असल्याने, यंत्रणांनी मुलगा हर्षवर्धन आणि मुलगी तृप्तबाला यांची दिवसभर कसून चौकशी केली. या कारवाईत काही महत्त्वाचे कागदोपत्री पुरावे हाती लागले असून, रोकड किंवा दागिन्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. खरातकडे मोठ्या प्रमाणावर ‘अपसंपदा’ असल्याचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. मात्र, केवळ खरात या प्रकरणाचा सूत्रधार आहेत की ते केवळ एक ‘चेहरा’, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या कार्यक्रमाला IG कराळेंची उपस्थिती; अंजली दमानियांनी फोटो, Video शेअर करत केला गंभीर आरोप
या पाच ठिकाणांवर एकाच वेळी तपासणी
ईडी आणि आयकर विभागाने (ED and Income Tax Department) केवळ घरापुरती ही कारवाई मर्यादित न ठेवता, खरातच्या आर्थिक नाड्या असलेल्या प्रमुख केंद्रांवर छापेमारी केली. कर्मयोगी नगरातील ‘तृप्तबाला’ निवासस्थान येथे कौटुंबिक चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी केली. तर, खराचे मुख्य कार्यालय असलेल्या कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टीज येथेही तपासणी केली. सिन्नरमधील एका पतसंस्थेत आर्थिक व्यवहारांची आणि ठेवींची तपासण केली. शिवाय मिरगाव येथील शिवनिका ट्रस्टच्या नावाखालील व्यवहारांसह इशानेश्वर मंदिर परिसराची पाहणी केली.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरात-पोफळेचे सोलापूर कनेक्शन; अकरा एकर जमिनीचा खरेदी दस्त उघड, पत्नीच्या नावे कोट्यवधींची माया?
पोते भरून यायचे पैसे
या संपूर्ण कारवाईचा केंद्रबिंदू ठरले आहे ते हर्षवर्धन खरात याचे विधान. यापूर्वी शिर्डी पोलीस आणि एसआयटीने (SIT) केलेल्या चौकशीत हर्षवर्धनने एक मोठा गौप्यस्फोट केला होता. आमच्या बंगल्यात पोते भरून पैसे येत होते, मात्र पुढे त्या पैशांचे काय झाले हे मला माहित नाही, अशी कबुली त्याने दिली होती. नेमके हेच ‘पोते भरून’ आलेले पैसे कुठे जिवले गेले? ते कोणापर्यंत पोहोचवले? आणि या अफाट माया जमवण्यामागे कोणाचे वरदहस्त आहेत? याचा तपास आता आयकर विभाग करत आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : महिलेकडून तरुणाची हत्या; कोयत्याने केले सपासप वार




