Wednesday, April 22, 2026
Homeक्राईमDevendra Fadnavis : "खरात प्रकरणाचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे, कुणीही …"; CM फडणवीसांच्या...

Devendra Fadnavis : “खरात प्रकरणाचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे, कुणीही …”; CM फडणवीसांच्या ‘त्या’ विधानामुळे अनेकांचे धाबे दणाणले

मुंबई | Mumbai

स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) श्री शिवानिका संस्थांचा अध्यक्ष अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ ‘कॅप्टन’ याला महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने (Crime Branch) बुधवारी (दि.१८) रोजी अटक केली. यानंतर त्याच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली असता त्यात तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले. खरात हा भाविष्य सांगत असल्याने त्यांच्याकडे अनेक भक्तांबरोबर राजकीय नेत्यांचा देखील राबता होता. त्यामुळे हे राजकीय नेते देखील या प्रकरणात गोत्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून, तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता एसआयटीने फॉरेन्सिक विभागाशी संपर्क साधून मूळ पुरावे, खरातच्या केबिनमधील द्रव पदार्थ, ग्लास, चॉटल्स, इतर मशिनरी आदी ताब्यात घेऊन पडताळणी सुरु केली आहे. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले, “अशोक खरातचे प्रकरण अत्यंत गंभीर असून आम्ही त्याचा भांडाफोड केला आहे. काही महिला लाजेखातर आणि सामाजिक दबावामुळे एकदम पुढे येत नाही. मात्र, आम्ही त्यांना धीर देऊन त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणत आहोत. महिलांबाबत दुर्व्यवहार करणार्‍यावर कठोर कारवाई करण्यात येईल. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून हाताळणी केली जात असून, नाशिक पोलीस आयुक्त आणि एसआयटी मिळून काम करत आहेत.त्यामुळे याप्रकरणात कुणालाही वाचवणार नाही.आपल्या तथाकथित शक्तीचा वापर करत खरातने महिलांना फसवले आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरात प्रकरण तपासात फॉरेन्सिकची एन्ट्री; तीन गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास, मशिनरी, CCTV, व्हिडिओंची पडताळणी

कोणीही राजकीय रंग देऊ नये

खरातवर कारवाई झाल्यानंतर काही महिला तक्रारीसाठी पुढे येत आहेत. याबाबत वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरु असून, पोलीस महासंचालकांनी तसे आदेश दिले आहेत. नाशिक पोलीस आयुक्त आणि एसआयटी मिळून काम करत आहेत. या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही. त्यामुळे याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. या प्रकरणाचे सगळ्यात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत पण ते पोलिसांचे काम आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आम्हाला राजकारणात नाही तर महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे महिलांवर जे अन्याय झाले त्यासंदर्भात आधी चौकशी होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मंत्रिमंडळांची बैठक बोलवून खरातच्या संस्थेला पाण्याची लाईन कुणी दिली?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशोक खरातकडे अनेक लोकं जायचे, विरोधी पक्षाचे लोक कुणाकडे जायचे याचेही पुरावे देऊ शकतो.कुणाकडे पुरावा असेल तर त्यांनी आणून द्यावा. खरातला कोण कोण भेटलं, फोटो आहेत ते कुणाचेही फोटो असू शकता. पण ज्यांनी मंत्रिमंडळांची बैठक बोलवून अशोक खरातच्या संस्थेला ४० किलोमीटरची पाईप लाइन टाकून पाणी दिलं त्यांच्याबाबत गप्प का आहेत? मंत्र्यांबाबत बोलणारे याबाबत का गप्प बसलेत? सिलेक्टिव्ह का बोलत आहात? असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला.

ताज्या बातम्या

Nepal Politics : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर गृहमंत्री सुदान गुरुंग...

0
काठमांडू । Kathmandu नेपाळच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झाला आहे. पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारमधील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी आपल्या पदाचा...