Thursday, October 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप बॉम्बवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप बॉम्बवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

मुंबई | Mumbai
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या आरोपावरून नवा दावा केला आहे. गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी त्यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये जरांगे यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये पोहोचल्याचा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, गेल्या तीन वर्षांपासून आपले आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नुकसान करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला.

मनोज जरांगे दावा करत असलेली ऑडिओ क्लिप विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपच्या कॉन्फरन्स मीटिंगची असल्याचं सांगण्यात येत आहे. श्रीकांत शिंदे मार्फत मनोज जरांगे यांना 500 पोहोचल्याचा भाजपच्या IT सेलच्या महिला सदस्याकडून या मीटिंगमध्ये दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकी अगोदरची ही ऑडिओ क्लिप असल्याची माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणावर भाजपकडून प्रतिक्रिया आली असून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे?
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत केलेल्या सनसनाटी आरोपांबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आपण केलेल्या आरोपांबाबत मनोज जरांगे पाटील यांनी पुरावे सादर केले पाहिजे. तसेच याबाबत त्यांनी रीतसर तक्रार दाखल केली पाहिजे. जरांगे पाटील यांनी सरकारला विनंती केली असेल तर चौकशी होईल. तो चौकशीचा भाग आहे. एकनाथ शिंदे यांनीहा काल चौकशी करून घ्या असं म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपलं म्हणणं मांडलंय, जरांगेंनीही आपलं म्हणणं मांडलं आहे आता चौकशी होईल. या चौकशीमधून सत्य बाहेर येईल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा ५०० कोटी पोहोचल्याचा दावा; थेट ऐकवली धक्कादायक ‘ऑडिओ क्लिप’

तर या संदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ही ऑडियो क्लिप विधानसभा निवडणुकीपूर्वीची आहे, असे या ऑडियो क्लिपच्या संदर्भांवरून दिसत आहे. आता ही ऑडियो क्लिप खरी आहे का याचा तपास झाला पाहिजे. एआयच्या जमान्यात अशा फॅब्रिकेटेड ऑडियो क्लिप समोर येत असतात. त्यामुळे गृहमंत्रालयाने या ऑडियो क्लिपची तपासणी करून सत्य समोर आणावे, अशी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत आहोत, असे नवनाथ बन म्हणाले.

ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हंटले आहे?
या रेकॉर्डिंगमध्ये दोन महिलांमध्ये हिंदी भाषेत संवाद झाल्याचे ऐकू येते. त्यापैकी एक महिला बोलताना जरांगे पाटील यांना आधीच 500 कोटी रुपये मिळाल्याचा दावा करते. हे पैसे श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून दिल्याचेही ती महिला संभाषणात सांगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीत जरांगे यांची भूमिका भाजपसाठी किती फायदेशीर ठरेल, याबाबत आपले मत वेगळे असल्याचे ती म्हणते.

ऑडिओ क्लिपमध्ये नेमके कोण आहेत? हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शोधून काढावे. जर त्यांनी याचा छडा लावला नाही तर यात त्यांचा हात आहे, असे मी समजेन, असेही जरांगे पाटील म्हणाले. ५०० कोटी कुणी कुणाला दिले, हे शोधले पाहिजे, हे षडयंत्र कुणी रचले, हे देखील समोर आले पाहिजे. माझ्याविरोधात षडयंत्र कुणी रचले, हे महाराष्ट्रासमोर आले पाहिजे. मराठा समाजाने सावध राहावे, असे जरांगे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

ऑडिओ

ऑडिओ क्लिप दोन-अडीच वर्षांपूर्वीची, आताच कशी बाहेर आली? रामदास कदमांचा सवाल,...

0
मुंबई | Mumbaiमराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचे बोलले जात...