Wednesday, May 20, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime News: महिलेला दैवी कोपापासून वाचवण्यासाठी वर्षभर अत्याचार; अशोक खरातला...

Ashok Kharat Crime News: महिलेला दैवी कोपापासून वाचवण्यासाठी वर्षभर अत्याचार; अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक | प्रतिनिधी
आध्यात्मिक शक्तीचा बागुलबुवा उभा करून महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधातील सहाव्या गुन्ह्याचा तपास शुक्रवार (दि. २३) पासून सुरू होत आहे. पाचव्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली असली, तरी नव्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी पुन्हा त्याला ताब्यात घेणार आहे.

खरातला दोन दिवसाची पोलीस कोठडी
एका विधवा महिलेला तिच्या मुलाच्या मृत्यूची भीती घालून दैवी कोपापासून वाचवण्याच्या नावाखाली खरातने वर्षभर तिच्यावर अत्याचार केले होते. या पाचव्या गुन्ह्यात पोलिसांनी खरातला १८ एप्रिलपासून कोठडीत घेतले होते. गुरुवारी या कोठडीची मुदत संपल्याने त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी अभियोक्ता किरण भेंडभर यांनी युक्तिवाद करत सहाव्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातची पुन्हा पोलीस कोठडी मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याने खरातला आज पुन्हा व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २६ एप्रिल पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

दोन ते चार डॉक्टरांना चौकशीसाठी नोटीस बजावणार?
खरातने पीडित महिलांचा गर्भपात करण्यासाठी शहरातील खासगी डॉक्टर व एका शासकीय अधिकाऱ्याची मदत घेतल्याचा संशय एसआयटीला आहे. या दोन ते चार डॉक्टरांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली जाणार असल्याचे कळते.

डॉक्टरसह एका शासकीय अधिकाऱ्याची चौकशी?
पंचवटीतील एका डॉक्टरसह एका शासकीय अधिकाऱ्याची चौकशी होणार आहे. त्यांनी किती महिलांचा गर्भपात केला, किती आठवड्यांचा गर्भ होता, त्यांची कायदेशीर नोंदणी होती का? नोंदी न ठेवताच गर्भपात केले या प्रश्नांची उत्तरे चौकशी समिती शोधण्याचा प्रयत्न करणार आहे.

खरातचा पोलीस कोठडीचा आत्तापर्यंत तपशील
गुन्ह्याचे स्वरूप
बलात्कार आणि फसवणूक १८ मार्च ते १ एप्रिल
महिला अत्याचार २ एप्रिल ते ८ एप्रिल
जादूटोणा आणि लैंगिक शोषण ९ एप्रिल ते १३ एप्रिल मार्च
पुत्रप्राप्तीचा दावा करून अत्याचार १४ एप्रिल ते १८ एप्रिल
विधवा महिलेवर अत्याचार १८ एप्रिल ते २२ एप्रिल
बलात्कार आणि अत्याचार २३ एप्रिलला पुन्हा ताबा घेणार

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...