Monday, November 9, 2026
HomeनगरAhilyanagar : घरबसल्या करा रासायनिक खतांचे बुकिंग

Ahilyanagar : घरबसल्या करा रासायनिक खतांचे बुकिंग

एफएफएस प्रणाली लागू झाल्याचा फायदा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अनुदानित रासायनिक खतांची खरेदी अधिक सुलभ, पारदर्शक आणि नियोजनबद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेली फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (एफएफएस) प्रणाली 22 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली. या प्रणालीमुळे शेतकर्‍यांना जवळच्या खत विक्री केंद्रावरील खतांची उपलब्धता तपासून घरबसल्या मोबाईलद्वारे खतांचे आगाऊ बुकिंग करता येणार आहे.

- Advertisement -

या प्रणालीअंतर्गत शेतकर्‍यांना गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या एफएफएस मोबाइल अ‍ॅपमध्ये शेतकरी ओळख क्रमांक किंवा आधार क्रमांकाच्या आधारे प्रवेश करता येईल. त्यानंतर शेतजमिनीचे क्षेत्र प्रमाणित करून पिकाची निवड करावी लागेल. पिकासाठी शिफारस केलेल्या खतांच्या प्रमाणानुसार किंवा स्वतःच्या गरजेनुसार खतांचे प्रमाण निश्चित करून जवळच्या खत विक्रेत्याकडे उपलब्ध खतांचे बुकिंग करता येईल.

बुकिंग केल्यानंतर तीन दिवसांच्या आत संबंधित विक्री केंद्रावर जाऊन बुकिंग क्रमांक दाखवून खत खरेदी करता येईल. एफएफएस प्रणालीमुळे शेतकर्‍यांना खतांचा उपलब्ध साठा मोबाईलवर पाहता येणार असून, गरजेनुसार खत खरेदीचे नियोजन करता येईल. आगाऊ बुकिंगमुळे खत खरेदीसाठी होणारी धावपळ कमी होण्यास मदत होईल. तसेच अनावश्यक खतांची किंवा इतर कृषी निविष्ठांची खरेदी टाळता येईल. खतांच्या छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्यास त्यावर आळा घालण्यास आणि खत विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासही या प्रणालीची मदत होणार आहे.

खतांची खरेदी अधिक सुलभ, पारदर्शक आणि नियोजनबद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेली फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (एफएफएस) प्रणाली 22 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांनी तसेच खत विक्रेत्यांनी या पारदर्शक व सुलभ प्रणालीचा अवलंब करावा.
– सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळामुळे जिल्ह्यात गहू पेरणीला ब्रेक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar यंदा पावसातील खंड आणि दुष्काळी परिस्थितीचा परिणाम रब्बी हंगामाच्या पेरणीवरही दिसू लागला आहे. जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरणीला अपेक्षित वेग मिळत नसून, 7...