Saturday, April 11, 2026
HomeनाशिकAshok Kharat Crime : तब्बल ११२ पतसंस्था 'सहकार'च्या रडारवर! सिन्नर-कोपरगाव-शिर्डी पट्ट्यात चौकशी

Ashok Kharat Crime : तब्बल ११२ पतसंस्था ‘सहकार’च्या रडारवर! सिन्नर-कोपरगाव-शिर्डी पट्ट्यात चौकशी

मॅनेजर आणि चेअरमनचे धाबे दणाणले

नाशिक | भारत पगारे | Nashik

अध्यात्म आणि दैवी शक्तीचा बुरखा पांघरून कोट्यवधींचे मायाजाल विणणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने (Ashok Kharat Case) आता संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या (North Maharashtra) सहकार क्षेत्रात भूकंप घडवून आणल्याचे हळूहळू पुढे येत आहे. खरातच्या पैसे यायचे’ अशी मुलाने ‘घरात पोत्यांनी कबुली दिल्यानंतर आता या काळ्या पैशाची विल्हेवाट नेमकी कुठे लावली गेली याचा शोध सुरू असतानाच सहकार विभागाने जम्बो उडी घेतली आहे. केवळ सिन्नरची जगदंबा किंवा कोपरगावची समता नव्हे, तर सिन्नर-कोपरगाव-शिर्डी आणि अहिल्यानगर या १०० कि.मी.च्या परिघातील तब्बल ११२ पतसंस्था आता सहकार खात्याच्या गुप्त रडारवर आल्या आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!

खरात फाईल्समध्ये (Kharat Files) नामकर्ण आवारे याच्या चौकशीनंतर अनेक धक्कादायक धागेदोरे हाती लागले आहेत. पतसंस्थेत मॅनेजर हाच सर्व आर्थिक व्यवहारांचा कणा असतो. त्यामुळे संशयास्पद ट्रान्झंक्शन झालेल्या सिन्नर ते अहिल्यानगरातील (Sinnar to Ahilyanagar) सुमारे ११२ पतसंस्थांमधील मॅनेजर आणि चेअरमन यांची भूमिका आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खरातचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी या पत्तसंस्थांचा वॉशिंग मशीनसारखा वापर झाला की काय? याचा तपास सहकार विभागाने अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू केला आहे. ज्या ठिकाणी बेनामी खाती किंवा मोठ्या रकमांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत, त्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊन चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. तर, संपूर्ण प्रकरणात राजकीय नेत्यांचे लागेबांधे असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. खरातचा पैसा काही बड्या राजकीय नावांच्या खात्यातून फिरवून तो रायगडमधील प्रोजेक्ट्समध्ये गुंतवल्याचा पोलिसांना संशय आहे.

हे देखील वाचा : Nashik Bribe Crime : नाशिक झेडपीत लाचखोरीचा ‘व्हायरस’; ठाकरेंनंतर पेसांतर्गत शिक्षण विभागाचा बहाद्दर ‘एसीबी’च्या जाळ्यात

चौकशीचा डेडली ट्रॅगल

सिन्नर, कोपरगाव आणि शिर्डी हा परिसर आर्थिकदृष्ट्या सधन मानला जातो. याच पट्ट्यातील ११२ पतसंस्थांची निवड ही केवळ योगायोग नसून, खरातच्या आर्थिक साम्राज्याचा तो केंद्रबिंदू असल्याचे मानले जात आहे. सहकार खात्याने या संस्थांमधील गेल्या काही वर्षांतील १० लाखांवरील सर्व व्यवहारांची माहिती मागवली असल्याचे समजते. त्यामुळे आजी माजी मॅनेजर आणि चेअरमनचे धाबे दणाणले आहेत.

हे देखील वाचा : Nashik Ravindra Erande Crime : एरंडेचा खरातप्रमाणेच अघोरी प्रथा, जादूटोणा; कार्यालयातून पक्ष्यांचे अवयव, सापाची कात, कवडी जप्त

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये कसं उतरलं? मंत्री भुजबळांनी स्पष्टच...

0
मुंबई | Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे मुंबईवरून पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमाला...