नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अशोक खरातच्या (Ashok Kharat) भोंदूगिरीचा आणि लैंगिक शोषणाचा विळखा खोलवर होता, याचे वास्तव आता समोर आले आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी खरात केवळ ‘दैवी शक्ती’चा बनाव करत नव्हता, तर त्यामागे एक हायटेक ‘प्रोफेशनल आयटी टीम’ सक्रिय होती. विशेष म्हणजे, खरातवर आतापर्यंत १५ गुन्हे (Case) दाखल होऊनही, त्याचे डिजिटल साम्राज्य सांभाळणारी ही टीम अद्याप एसआयटीच्या रडारवर का आली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एसआयटी या ‘अदृश्य’ टीमच्या मुसक्या आवळणार का, याकडे संर्वांचे लक्ष आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातची उलाढाल सापडलीच ! ईडीकडून अशोकसह कल्पनाची चार बँक खाती गोठवली
स्वयंघोषित कॅप्टन खरातने महिलांची (Women) कौटुंबिक आणि वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी ‘झॅम्बो’ नावाच्या ॲपचा खुबीने वापर केला. ही माहिती गोळा करण्यासाठी त्याने काही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बेरोजगारांना हेरुन त्यांची एक गोपनीय फौज कार्यरत केली होती. ही टीम सोशल मीडिया आणि ॲपच्या माध्यमातून भाविकांच्या, विशेषतः महिलांच्या खासगी आयुष्यातील समस्या, कौटुंबिक वाद आणि आर्थिक स्थितीची माहिती संकलित करत होती. ही कच्ची व प्रॉपर माहिती खरातला पुरवली जात होती. जेव्हा एखादी महिला दरबारात यायची,तेव्हा खरात तिला तिच्या भूतकाळातील किंवा घरातील गुप्त गोष्टी सांगून थक्क करायचा. हा चमत्कार नसून तो डेटा चोरीचा प्रकार होता, ज्यातून महिलांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण केली जात होती.
हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशिकच्या ‘निदा’ने रचले धर्मांतर कांड; न्यायालयात खुलासा, तीन नव्या पीडितांना धीर
सेटिंग लावल्याशिवाय नंबर मिळेना!
खरातच्या दरबारात केवळ गर्दीच नव्हती, तर तिथे चक्क ‘टोकन सिस्टीम’ आणि ‘वेटिंग लिस्ट’चे व्यवस्थापन चालत होते. सामान्य नागरिक आपल्या समस्या सोडवण्यासाठी सहा-सहा, महिने वेटिंगवर असायचे. मात्र, या रांगेतही मोठा घोळ होता. राजकीय नेते, अधिकारी आणि प्रतिष्ठितांना ‘प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर तातडीने प्रवेश मिळत होता. सामान्य भक्ताला जर लवकर नंबर हवा असेल, तर खरातच्या खास माणसांशी ‘सेटिंग’ करावी लागायची. या व्यवस्थापनातूनही मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर रॅकेट; छळवणुकीला ‘एचआर’ ची साथ, महिलेस पुण्यातून अटक
एसआयटीच्या तपासावर प्रश्नचिन्ह?
आतापर्यंत खरातवर १५ गुन्हे नोंद झाले आहेत. पोलिसांनी केवळ दोन नोंदवह्या हस्तगत केल्या आहेत, ज्यामध्ये भक्तांची नावे आणि क्रमांक आहेत. मात्र, हे सर्व व्यवस्थापन करणारी डिजिटल टीम (Digital Team) कुठे आहे? खरातने झेंम्बो ॲप हाताळताना महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी जाळे विणले आणि टीमने दरबारातील गर्दीचे नियोजन केले, त्यापैकी एकही सदस्य अद्याप पोलिसांच्या (Police) ताब्यात नाही. ही आयटी टीम नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होती आणि तपास यंत्रणांपासून त्यांना कोणी वाचवले आहे का? हे कोडे अद्याप उलगडलेले नाही.
हे देखील वाचा : Nashik Accident News : दुर्दैवी घटना! जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतताना आयशर ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, अनेक जखमी




