पंचाळे | वार्ताहर | Pnachale
सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) पंचाळे गावाजवळ (Panchale Village) आज (शनिवारी) मध्यरात्री एकच्या सुमारास आयशर ट्रक आणि पिकअपच्या (Eicher trucks and Pickups) भीषण अपघातात (Accident) चार जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : मंत्री भुजबळांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड करताना पायलटची गंभीर चूक; मोठा अनर्थ…
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील रहिवाशी मोरे, गांगुर्डे व नवले या आदिवासी कुटुंबातील नातेवाईकांचे सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे शुक्रवार (दि.१०) रोजी सायंकाळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी पंचाळे येथून या परिवारातील दहा ते बारा जण सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे गेले होते. यावेळी कार्यक्रम आटोपून घराकडे परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास पिकअप गाडी क्रमांक (एमएच १५ जेसी ६३३३) पंचाळे शहामार्गे पंचाळे हायस्कूल जवळ आली असताना शहा गावाकडे जाणाऱ्या कोंबड खाद्याचा पुरवठा करणारा आयशर क्रमांक (एमएच १४ एमटी ३८३९) ने पिकअपला जोरदार धडक दिली.
हे देखील वाचा : Tushar Bhosale : “मौलाना शरद पवार जाळीदार टोप्या घालून इफ्तार…”; ‘त्या’ विधानावरून भाजपच्या तुषार भोसलेंची जोरदार टीका
या धडकेमुळे पिकअपने पेट घेतल्याने चालक किरण रवींद्र मोरे (वय २३), शुभम गणेश नवले (वय २१), रिंकू शुभम नवले (वय १९), मिराबाई विश्वनाथ गांगुर्डे (वय ६८) सर्व राहणार पंचाळे यांचा आगीच्या ज्वालांनी होरपळून मृत्यू झाला. यावेळी पाठीमागे बसलेल्या दहा ते बारा जणांनी जीव वाचवण्यासाठी पिकअपमधून उड्या घेतल्या. यात अनेक जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर रॅकेट; छळवणुकीला ‘एचआर’ ची साथ, महिलेस पुण्यातून अटक
दरम्यान, यावेळी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती कळविल्यानंतर अग्निशामक दलासह आपत्ती व्यवस्थापन पथकाने पंचाळे गावात हजेरी लावत पिकअपची आग विझवली. यानंतर होरपळून मृत्यू झालेल्या चार जणांचे मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी आज (शनिवारी) त्यांच्यावर शवविच्छेदन करून मृतदेह पांचाळ येथे चार रुग्णवाहिकेमार्फत आणून नातेवाईकांच्या ताब्यात दिले. यावेळी मृतदेह बघताच नातेवाईक आणि कुटुंबियांनी एकच टाहो फोडला होता.
अपघातातील जखमी व्यक्तींची नावे
अपघातात सुनिता गणेश नवले (वय ३८) सचिन गणेश नवले (वय १८) दिव्या गणेश नवले (वय १७) समीक्षा अनिल गांगुर्डे (वय ९) आदिती पांडुरंग आहेर (वय १३) आरती पांडुरंग आहेर (वय ९) देवांश किरण मोरे (वय २) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर सिन्नर व नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातची उलाढाल सापडलीच ! ईडीकडून अशोकसह कल्पनाची चार बँक खाती गोठवली
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
आज (शनिवार) दुपारी बारा वाजता या चारही मृतदेहांवर पंचाळे स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना व वारसांना सामाजिक व शासनाच्या विविध योजनातून सहकार्य करण्याचे आश्वासन माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चव्हाणके यांनी दिले.
चार मृतदेहांवर एकाच वेळी केले अंत्यसंस्कार
पंचाळे गावामध्ये स्मशानभूमीमध्ये एकाच वेळी चार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची पहिलीच वेळ असल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्मशानभूमिमध्ये एक व बाहेर एकाच ठिकाणी तीन जणांना दहन करण्यात आले. या अंत्यविधीसाठी मृतांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दिंडोरी तालुक्यात घडलेल्या घटनांनंतर पंचाळे येथील चार जणांच्या अपघाती मृत्यूने पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
वाहन चालकावर गुन्हा दाखल
अपघात करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध पंचाळे येथील गणेश संपत नवले (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर ट्रक क्रमांक (एमएच १४ एमटी ३८३९) चा चालक प्रवीण अशोक काळे रा. खोदड,ता. जुन्नर,जि. पुणे यांच्यावर बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




