नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मुंबई नाका हद्दीतील (Mumbai Naka Area) एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीच्या (Job) नावाखाली सुरू असलेल्या ‘धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराच्या’ काळ्या कारभाराचा पर्दाफाश झाल्यानंतर, आता या प्रकरणातील मोठा मासा पोलिसांच्या (Police) जाळ्यात अडकला आहे. पीडित तरुणींच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांना मानसिक कोंडीत पकडणारी कंपनीची ‘एचआर’ व असिस्टंट जनरल मॅनेजर संशयित आश्विनी अशोक चैनानी (वय ५१, रा. पुणे) हिला नाशिक पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत.
या अटकेमुळे कंपनीतील ‘वरदहस्त’ लाभलेल्या इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणातील पीडित तरूणींनी होणार्या अन्यायाबाबत आश्विनी चैनानीला ई-मेलद्वारे दाद मागितली होती. तेव्हा तिने मदतीचा हात देण्याऐवजी संशयितांनाच (Suspected) साथ दिल्याचा युक्तिवाद शुक्रवारी (दि. १०) न्यायालयात करण्यात आला. तिने तक्रारींकडे दुर्लक्ष तर केलेच, शिवाय पीडित तरुणींवर कामाचा प्रचंड ‘वर्कलोड’ टाकून मानसिकदृष्ट्या खच्ची करण्याचा प्रयत्न केला.
हे देखील वाचा : Nashik Crime News : कॉर्पोरेटच्या आड ‘जिहाद’; कंपनीत तरुणींचे शोषण आणि धर्मांतराचा कट
दरम्यान, आश्विनी चैनानी हिला न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, या गुन्ह्यातील टीमलीडर व संशयित आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशी यांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (न्यायालयीन कोठडी) करण्यात आली आहे. न्यायाधीश आर. सी. नरवाडिया यांच्यासमोर झालेल्या युक्तिवादात सरकारी पक्षातर्फे अभियोग कक्षाच्या सहाय्यक संचालक अॅड. किरण बेंडभर आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिकेत आव्हाड यांनी संशयित तपासात सहकार्य करत नसल्याचा युक्तिवाद केला. तर संशयितांच्या बाजूने वकील राहुल कासलीवाल, बाबा सिद्दीकी, हानिद शेख यांनी सबळ पुराव्यांचा अभाव असल्याचा दावा केला. मात्र, चैनानीच्या अटकेमुळे आता या गुन्ह्यातील ‘कॉर्पोरेट अँगल’ गडद झाला आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातची उलाढाल सापडलीच ! ईडीकडून अशोकसह कल्पनाची चार बँक खाती गोठवली
पाठिंबा दिला?
अश्विनीन चैनानी महत्वाच्या पदावर आहेत. त्यांनी पीडितांच्या तक्रारीवर दुर्लक्ष करून संशयितांना उलट पाठिंबा देत चिथावणी दिली. त्यामुळे संशयितांचा आत्मविश्वास वाढला व त्यांनी आणखीन छळ केला. गुन्ह्यास प्रतिबंध न करता चिथावणी दिली?, नेमका उद्देश काय?, यात आणखी कोण अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत, याचा तपास करण्यासाठी अॅड. किरण बेंडभर यांनी चैनानीची पोलीस कोठडी मागितली.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली धक्कादायक माहिती
एसआयटीच्या टीम पुण्यात
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुण्याच्या लुलानगर परिसरातील चैनानीच्या निवासस्थानाजवळ आणि कंपनी परिसरात सापळा रचला होता. गुरुवारी तिला ताब्यात घेतल्यानंतर शुक्रवारी अटक करण्यात आली.
गुन्ह्यांची मालिका, निदा पसार
या प्रकरणात आतापर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल आहेत (देवळाली कॅम्प १ आणि मुंबई नाव नाका ८). यामध्ये ८ महिला आणि १ पुरुष फिर्यादी आहे. मुख्य संशयित दानिश शेख आधीच कारागृहात आहे, तर निदा खान ही महिला संशयित अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहे. आता चैनानीकडे सखोल तपास केला जाणार आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : गंगाधर ही शक्तिमान है! तोतया सबनीस निघाला पत्रकार एरंडे; १० जणांना १३ लाखांचा गंडा




