दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
दिंडोरी येथील विहीरीत (Well) पडून नऊ जण मृत्यूमुखी पडले. त्यानंतर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) खासदार भास्कर भगरे, माजी आमदार धनराज महाले, माजी आमदार रामदास चारोस्कर आदींनी भेट देत कुटूंबियाचे सात्वंन केले. यावेळी नातलगांनी तक्रारीचा सुर आवळला. घटनेनंतर कुंभमेळा मंत्री महाजन यांनी तत्काळ विहीर बुजविण्याचे आदेश दिले असून, विहीर पाडण्यास सुरवात झाली आहे.
हे देखील वाचा : Breaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे कुटुंबीयांवर काळाचा घाला
दिंडोरी येथे काल (शुक्रवारी) रात्री अपघात होऊन इर्टिका कार विहीरीत पडली होती. त्यात नऊ जण मृत्युमुखी पडले. या पार्श्वभूमीवर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार धनराज महाले, माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी तत्काळ घटनास्थळी सकाळी भेट देत अपघाताची माहिती घेतली.
हे देखील वाचा : Nashik Dindori Accident News : कार विहिरीत कोसळून नऊ जणांचा करुण अंत; दुर्घटनेनंतर मंत्री झिरवाळांना स्थानिक घेराव घालत म्हणाले “या निष्पाप…”
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Aayush Prasad) यांनी रस्ता कामाची व विहीरीची माहिती देतांना विहीरीच्या मालकाविरुद्ध कारवाई केल्याचे सांगितले. त्याचबरोबर रस्ता कामाची चौकशी करुन नगरपंचायतीच्या अधिकार्याने काय काय उपाययोजना पुर्वी केल्या होत्या, याबाबत अहवाल मागितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर मृतांच्या नातलगांनी मंत्री महाजन, झिरवाळ यांच्याकडे तक्रारी मांडल्या. तसेच गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधत पाच लाख रुपये शासनाकडून मदतीची घोषणा केली. त्याचबरोबर नातलगांचे सांत्वन केले.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : दिंडोरीतील कार अपघाताच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा
दरम्यान, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी माजी आमदार धनराज महाले, संपर्कनेते सुनील पाटील, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्यासह भेट देत विहीरीची पाहणी केली. यानंतर अधिकार्यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) जाऊन मृतदेहाची पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. शिक्षण विभागाला विद्यार्थी योजनेचा लाभ देण्याच्या सूचना देत शासनस्तरावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात नातलगांनी व सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
हे देखील वाचा : Breaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे कुटुंबीयांवर काळाचा घाला





