Tuesday, April 14, 2026
HomeनगरShirdi : भोंदू खरातच्या ताब्यासाठी शिर्डी पोलिसांची न्यायालयात धाव

Shirdi : भोंदू खरातच्या ताब्यासाठी शिर्डी पोलिसांची न्यायालयात धाव

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी आणि सिन्नर येथील पतसंस्थांमध्ये शेकडो बोगस खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करणार्‍या भोंदूबाबा अशोक खरात च्या मुसक्या आवळण्यासाठी शिर्डी पोलिसांनी आता कायदेशीर हालचाली तीव्र केल्या आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी खरातला पोलीस कोठडीत घेण्याच्या उद्देशाने शिर्डी पोलिसांनी राहाता न्यायालयात विशेष अर्ज दाखल केला असून या अर्जावरील सुनावणीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. खरातच्या ताब्यानंतर या महाघोटाळ्यातील अनेक बड्या धेंडांचे चेहरे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

समता नागरी सहकारी पतसंस्थेत केवळ 57 व्यक्तींच्या नावावर तब्बल 100 बनावट खाती उघडून त्यावर कोट्यवधींची उलाढाल केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे. या तपासाची व्याप्ती वाढली असून पोलिसांनी आतापर्यंत 33 संशयित खातेदारांची झाडाझडती घेतली आहे. यामध्ये राजकीय नेते, आजी-माजी नगरसेवक आणि दोन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. चौकशीदरम्यान या हायप्रोफाईल व्यक्तींनी, संबंधित खात्यांशी आमचा कोणताही संबंध नसून आमची कागदपत्रे आणि सह्यांचा गैरवापर करण्यात आला आहे, असा लेखी जबाब दिल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

केवळ आर्थिक गैरव्यवहारच नव्हे, तर जमिनी बळकावणे, सावकारी आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप खरातवर आहेत. सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेतही अशाच प्रकारे बोगस खात्यांचे जाळे विणल्याचे समोर आले आहे. मंगळवारी दोन आरटीओ अधिकार्‍यांच्या जबाबाने या प्रकरणाला नवीन वळण मिळाले असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे डोळे लागले असून खरात पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर या बँकिंग मायाजालाचा मास्टरमाईंड कोण, हे स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

इराणला

इराणला अमेरिकेची सर्वात मोठी अट मान्य? अमेरिकेकडून वाटाघाटीसाठी दुसऱ्या फेरीची घोषणा,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिका आणि इराण यांच्यात लवकरच चर्चेच्या दुसऱ्या फेरीची शक्यता आहे. इस्लामाबाद किंवा जिनेव्हामध्ये दोन्ही देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी होऊ...