पुणे | Pune
नाशिकमधील कॅप्टन खरात प्रकरणी मागील दोन दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्यावर मोठी टीका होत आहे. संजय राऊत, रूपाली ठोंबरे पाटील, सुषमा अंधारे यांनी चाकणकरांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यातच आता रूपाली ठोंबरेनी चाकणकर फरार असल्याची पोस्ट केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पोस्टचा नेमका अर्थ काय आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे. भोंदू खरातचे अश्लील कारनामे समोर आल्यानंतर याप्रकरणात अनेक पुढाऱ्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा रंगली आहे.
अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यांच्यात यापूर्वी सुद्धा अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. तर भोंदू अशोक खरात याच्या व्हिडिओवरून आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकरांवर थेट हल्ला चढवला आहे. चाकणकरांचे या भोंदूसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर खासदार संजय राऊतांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आता रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ‘राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार … बजाव टाली’ असे लिहिले आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
या पोस्टमधून रूपाली पाटील यांनी खोचक दावा की खरेच चाकणकर गायब आहेत, अशी चर्चा पुण्यातील सोशल मीडियावर सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून रुपाली चाकणकर या माध्यमांसमोर येत नसल्याने रूपाली ठोंबरे यांनी अशी पोस्ट केल्याचे बोलले जात आहे.
https://www.facebook.com/share/p/1K2HKmsSLY





