Saturday, June 13, 2026
Homeनगरभोंदूबाबा खरात प्रकरणामुळे पुणतांब्यात पूजेचे प्रमाण घटले

भोंदूबाबा खरात प्रकरणामुळे पुणतांब्यात पूजेचे प्रमाण घटले

पुणतांबा (वार्ताहर)

राज्यात सध्या नाशिक येथील भोंदूबाबा खरात यांच्या प्रकरणाचे सर्वत्र पडसाद उमटत असून बाबांच्या कारनाम्यामुळे समाजातील सर्वच घटकामध्ये भोंदूबाबा विषयी संताप व्यक्त केला जात आहे. मंत्र तंत्र तसेच अघोरी विद्या व पूजेच्या नावाखाली भोंदूबाबाने महिलांवर केलेल्या अत्याचारामुळे समाजाचा भोंदूबाबा व महाराजावरील विश्वास कमी झाला आहे.

- Advertisement -

गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथे या प्रकरणामुळे काही दिवसापासून पूजा, धार्मिक विधीचे प्रमाण एकदम कमी झाले आहे. विशेषतः अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी नदीपात्रात अनेक जण महिलांसह विविध पूजेसाठी येत असतात. नुकत्याच झालेल्या अमावस्येच्या दिवशी असे प्रकार झाले नाही, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

तसेच मंदिर परिसरातील नेहमीच नक्षत्रांशी निगडीत विविध पूजा, कर्मकांड सुरू असते. त्याचेही प्रमाण कमी झाले आहे. ज्योतिषाकडे जाऊन ग्रहस्थिती जाणून त्यावर उपाय म्हणून विविध पूजा व रत्ने देणाऱ्या गुरु बाबतही लोकांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. काही गुरु तर पूजा व रत्न दिल्याशिवाय त्यांच्याकडे आलेल्या व्यक्ती, महिला, लग्न न झालेली मुलामुलींना जाऊ देत नाही. त्याचा आग्रह करतात. त्या गुरुबाबतही खरात प्रकरणामुळे समाजात नेमके वास्तव समजले आहे.

भोंदूबाबाने एक रुपयाचा चिंचोका एक लाख रुपयाला तसेच १० लाख रुपये बाटलीप्रमाणे मध विकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे आपणही पूजाअर्चा करून फसल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. भोंदूबाबा खरातच्या प्रकरणामुळे परिसरात बाबा व महाराज विषयीच्या विश्वासाला तडा गेल्याची चर्चा आहे.आहे. तसेच मंदिर परिसरातील नेहमीच नक्षत्रांशी निगडीत विविध पूजा, कर्मकांड सुरू असते.

त्याचेही प्रमाण कमी झाले आहे. ज्योतिषाकडे जाऊन ग्रहस्थिती जाणून त्यावर उपाय म्हणून विविध पूजा व रत्ने देणाऱ्या गुरु बाबतही लोकांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. काही गुरु तर पूजा व रत्न दिल्याशिवाय त्यांच्याकडे आलेल्या व्यक्ती, महिला, लग्न न झालेली मुलामुलींना जाऊ देत नाही. त्याचा आग्रह करतात. त्या गुरुबाबतही खरात प्रकरणामुळे समाजात नेमके वास्तव समजले आहे.

भोंदूबाबाने एक रुपयाचा चिंचोका एक लाख रुपयाला तसेच १० लाख रुपये बाटलीप्रमाणे मध विकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे आपणही पूजाअर्चा करून फसल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. भोंदूबाबा खरातच्या प्रकरणामुळे परिसरात बाबा व महाराज विषयीच्या विश्वासाला तडा गेल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्या

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख; ३० जूनपासून स्वीकारणार पदभार

0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था New Delhi केंद्र सरकारने सध्या उपलष्करप्रमुख (Vice Chief of Army Staff) म्हणून कार्यरत असलेल्या लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताच्या पुढील...