Wednesday, September 30, 2026
Homeक्राईमShrirampur : बीडच्या अल्पवयीन मुलीची श्रीरामपूरातून सुटका

Shrirampur : बीडच्या अल्पवयीन मुलीची श्रीरामपूरातून सुटका

अपहरणप्रकरणी आरोपी अटकेत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

बीड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला श्रीरामपूर येथे आणल्याची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत, मुलीची सुखरूप सुटका केली. तसेच अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी नेकनूर (जि. बीड) पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जुलै 2026 रोजी सकाळी नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तपासाच्या कामानिमित्त श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आले होते. त्यांच्याकडील दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना दिली. अपहरणकर्ता श्रीरामपूर परिसरात राहत असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी मुलीचा फोटो पोलिसांना उपलब्ध करून दिला.

या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोधपथक सक्रिय केले. केवळ उपलब्ध छायाचित्राच्या आधारे शोधमोहीम राबवत पोलिसांनी संजयनगर, वॉर्ड क्रमांक 1, श्रीरामपूर येथून अल्पवयीन मुलीचा शोध लावला. यावेळी मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच अपहरणप्रकरणातील आरोपी शुभम नामदेव मिसाळ (वय 22, रा. आगर कानडगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याला त्याच्या दोन नातेवाईकांसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी नेकनूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम तसेच मच्छिंद्र कातखडे, संपत बडे, अमोल पडोळे, अजित पटारे, अमोल गायकवाड, ज्ञानेश्वर वाघमोडे, सचिन दुकळे, सागर बनसोडे, रविंद्र शिंदे यांच्यासह नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व्ही. ए. क्षिरसागर आणि एच. एम. कदम यांचा सहभाग होता.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...