Thursday, May 2, 2024
Homeजळगावभिंतीवर मनातले सार काही लिहले अन् संपविली जीवनयात्रा

भिंतीवर मनातले सार काही लिहले अन् संपविली जीवनयात्रा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

पत्नी वादातून माहेरी निघून गेली. तिला घेण्यासाठी तो सुरतहून गावी आला. जाण्यापूर्वीच त्याचा पत्नीशी फोनवर वाद झाला.

- Advertisement -

सर्व काही मनातच होते. मनातल तो कुणाजवळही व्यक्त करु शकला नाही. चौथीपर्यंत शिक्षण झाल्याने सुसाईडही लिहिणे जमले नाही. मग हे मनात घुटमळणारं सारं काही जस लिहिता येईल तसे त्याच्या भाषेत भिंतीवर उतरविल अन् जगाचा निरोप घेतला.

रामचंद्र उर्फ भुरा देवराम (माळी) महाजन (वय-28) रा.ढंढोरे नगर, आसोदा असे मयत तरुणाचे नाव आहे. कौटुंबिक वादातून त्यााने राहत्या घरी त्याने 16 जानेवारी रोजी दुपारी गळफास घेवून आत्महत्या केली.

पत्नी मुलीला घेवून माहेरी आल्याने होता नैराश्यात

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी, रामचंद्र माळी हा सुरत येथे एका कंपनीत चालक म्हणून कामाला होता. सुरत येथेच तो पत्नी निखिता व मुलगी रक्षा यांच्यासह वास्तव्यास होता.

कौटुंबिक वादातून काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी निखिता ही माहेरी खामगाव जि.बुलढाणा येथे मुलीला सोबत घेवून गेली. यानंतर तिला घेण्यासाठी रामचंद्र हा शनिवारी सकाळी सुरतहून आसोदा येथे आला. यानंतर त्याने त्याचा मोठा भाऊ रामकृष्ण याच्याशी याबाबत चर्चा केली. त्यावर रामकृष्ण याने रामचंद्र याला तु खामगाव जावू नको, तिला आपण आसोदा येथे बोलावून घेवू, यानंतर काहीतरी मार्ग काढू असे सांगितले.

यावेळी रामचंद्र याचा मामेभाऊ सुध्दा होता. तिघांची चर्चा सुरु असतांना, अचानकपणे रामचंद्र हा निघून गेला. थोड्या वेळाने रामचंद्र याचा भाऊ रामकृष्ण हा नातेवाईकांना सोडण्यास निघून गेला. यानंतर घरी आलेल्या रामचंद्र याने पत्नी निखिला हिला फोन लावला. फोनवर दोघांचे भांडण अन् वाद झाला. या वादानंतर रामचंद्र राहत्या घरात दोराने गळफास घेवून आत्महत्या केली.

रामचंद्र याची आई शेतात, तर वडील गावात गेले होते. वडील घरी आल्यानंतर वरच्या खोली गेलेे असता रामचंद्र हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. यानंतर रामकृष्ण याने तातडीने भाऊ रामचंद्र यास जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ विजय कुरकुरे यांनी मयत घोषित केले.

तालुका पोलीस ठाण्याचे वासदेव मराठे, बापू पाटील यांनी पंचनामा तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी डॉ. विजय कुरकुरे यांच्या खबरीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई कल्पनाबाई, वडील देवराम सुपडू माळी, भाऊ रामकृष्ण, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

भिंतीवरील आशयात पत्नी साडू, साली, सासूसह पत्नीचे नाव

रामचंद्र याने आत्महत्या करण्यापुर्वी लाल मार्करने भिंतीवर सुसाईड नोट लिहिली. चौथी शिकलेला असल्याने तोडक्या मोडक्या भाषेत त्याने हिलले आहे. श्री गणेशाय नम असे लिहून त्याने सुरुवात केली.

तोडक्या मोडक्या अक्षरातील हे कुणालाही वाचता येत नाहीये, यात रामचंद्र याने पत्नी, सासू, साडू आणि पत्नीची बहिण यांची नावे लिहील असून त्यांच्यावर काही तरी आरोप केले आहेत. काहीतरी कौटुंबिक वादातूनच रामचंद्रने आत्महत्या केली असल्याचे भिंतीवरील आशयावरुन स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या