शिरवाडे वाकद | प्रतिनिधी Shirvade Vakad
दत्तनगर लासलगाव येथील एका अल्पवयीन युवतीवर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला अपर जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची सजा ठोठावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलीची आई, वय ४० यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, आरोपी अतिष दगडु ढगे वय – २४ रा.टाकळी विंचुर, ता.निफाड याने फिर्यादीचे राहते घरात दि.६ नोव्हे २०१९ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास अनाधिकृतपणे प्रवेश करुन फिर्यादीची मुलगी वय १७ वर्ष हिस, ‘तु तुझे मित्र मैत्रिणी सोबत का फिरते’ यावरुन वाद घालत कुरापत काढुन, फिर्यादीची मुलगी हिचे अंगावर चाकु, चॉपर सारख्या धारदार चाकुने पोटावर हातापायावर वार करुन मारुन तिस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच स्वतःचे अंगावर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद दिली होती.
हे देखील वाचा – Accident : कार-दुचाकीचा अपघात; पती-पत्नीचा मृत्यू
त्यांच्या फिर्यादीवरून गु.र.न व कलम २५७/२०२१९ भा.द.वि कलम ३०७,३०९,४५२ प्रमाणे लासलगाव पोलीस ठाण्यात दगुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर सेशन केस नं ५४/२०१९ मा.श्री.बा.द. पवार, अपर जिल्हा व सत्र न्यायालय निफाड यांचे न्यायालयात चालली. सरकारी वकील श्रीमती बंगले यांनी केस हाताळली. तपास अधिकारी म्हणून सहा.पो.निरी.खंडेराव रजवे व शिवचरण पांढरे यांनी काम पाहिले तर पो.ना किशोर भाउराव लासुरकर, पो.हवा आर.पी.शिंदे यांनी पैरवी केली. मा.न्यायालयाने आरोपी अतिष दगडु ढगे यांस भा.द.वि कलम ३०७ मध्ये दोषमुक्त, भा.द.वि कलम ४५२ मधे ३ वर्ष सक्तमजुरी व १००० रु दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद तर भा.द.वि कलम ३०९ मधे ३ महिने साधी कैद व १००० रु दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैदेची सजा ठोठावली.
हे देखील वाचा – Cyber Crime : आधार कार्ड अपडेट करण्याचा केला बहाणा; तीन लाख रुपयांना घातला गंडा
सन २०१९ मध्ये लासलगाव सारख्या भरवस्तीत अल्पवयीन मुलीवर हल्ला झाल्याने हे प्रकरण खूप गाजले होते. तत्कालीन स.पो.नि. शिवचरण पांढरे यांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळून या प्रकरणाची कसून चौकशी करून प्रकरण न्यायालयात दाखल केले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा