Sunday, February 9, 2025
HomeनाशिकAccident : कार-दुचाकीचा अपघात; पती-पत्नीचा मृत्यू

Accident : कार-दुचाकीचा अपघात; पती-पत्नीचा मृत्यू

महिला कारचालकाविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा

नाशिक। प्रतिनिधी Nashik

साेमेश्वरनजीक घडलेल्या अपघातात दांमपत्यापैकी पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना साेमवारी(दि.२५) घडली हाेती. त्यात आता गंभीर जखमी वृद्धेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे गंगापूर पोलिस ठाण्यात कार चालक महिला स्मिता विजय रासकर (वय ५० रा. पंडित कॉलनी) यांच्याविराेधात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सुरेश वसंतराव वाखारकर (६४) व विद्या सुरेश वाखारकर (६०, दोघे रा. बाफना बाजारजवळ, अमृतधाम, पंचवटी) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. गंगापुररोडवरील सोमेश्वर मंदिराकडून जेहान सिग्नलकडे वखारकर दाम्पत्य त्यांच्या एमएच १५ जीडब्ल्यू ४२९४ क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते.

यावेळी अचानक समाेरुन आलेल्या एमएच १५ जीएम ००६६ क्रमांकाच्या कारचालकाने अचानक वळण घेतले. त्यामुळे वखारकर यांची दुचाकी कारवर आदळली. त्यात दोघांना गंभीर दुखापत झाल्याने सुरेश वखारकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर विद्या वाखारकर यांना गंगापूर रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान, त्यांचाही मृत्यू झाला. स्मिता रासकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या