Wednesday, December 4, 2024
Homeनगरसोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’

सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’

आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सायबर पोलिसांकडून सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जात आहे. कुठल्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये आचारसंहितेचा भंग होईल अथवा दोन गटात वाद होईल अशी पोस्ट अथवा मजकुर, फोटो, व्हीडीओ टाकल्याचे निदर्शनास आल्यास त्याला संबंधित व्यक्तीसह ग्रुप अ‍ॅडमीन जबाबदार असणार आहे. त्या करीता अ‍ॅडमीन यांनी आपल्या अ‍ॅपची सेटिंग चेंज करून ‘ओनली फॉर अ‍ॅडमीन’ अशी करून घ्यावी, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, त्यांनी तशी नोटीस जारी केली आहे. आदर्श आचारसंहिता भंग झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येऊन आपल्याविरूध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदरची नोटीस आपल्या विरूध्द न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे. मतदान प्रकिया व प्रचारादरम्यान कोणतेही गैरकृत्य करण्यापासून परावृत्त होणेकरिता पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे.

कोणत्याही उमेदवाराशी संबंधित त्यांचे वैयक्तीक कौटुंबिक अगर सामाजिक स्तरावर अवहेलना होईल असे आक्षेपार्ह टिकाटीप्पणी करणे, मजकूर, फोटो, व्हिडीओ करून प्रसारीत करणे अथवा आलेल्या संदेशावर आपले आक्षेपार्ह मत प्रकट करणे व पुढे पाठविणे, मतदाराचे मन वळवण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक, भाषिक तसेच जातीत व्देष पसरविणारे आक्षेपार्ह मजकूर फोटो, व्हिडीओ करून प्रसारीत करणे, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे स्वातंत्र्य सोशल मीडिया ग्रुप निर्माण करून त्याव्दारे आक्षेपार्ह मजकूर फोटो, व्हिडीओ, करून प्रसारीत करणे अथवा कृत्य करणे, कुठल्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये आचारसंहितेचा भंग होईल अथवा दोन गटांत वाद होईल अशी पोस्ट अथवा मजकूर, फोटो, व्हीडीओ टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीसह ग्रुप अ‍ॅडमीन जबाबदार असणार आहे, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या