Wednesday, December 4, 2024
Homeनाशिकविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शनिवारी दिली. आहे

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत १५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल अ‍ॅ‍ॅपवर एकूण ३ हजार ७६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३ हजार ७३४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्याची माहितीही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल अ‍ॅ‍ॅप हे कोणत्याही पस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या अ‍ॅ‍ॅपपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या