Sunday, November 15, 2026
Homeनाशिकघाटकोपर दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखापर्यंत मदत

घाटकोपर दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखापर्यंत मदत

-पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

मुंबई । प्रतिनिधी

वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमींना राज्य सरकारच्या वतीने अडीच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारकडून केला जाणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी दिली.

- Advertisement -

लोढा यांनी आज घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात जाऊन होर्डिंग दुर्घटनेतील जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी मदतीबाबत माहिती दिली. सद्यस्थितीमध्ये राजावाडी हॉस्पिटलमध्ये १ व्यक्ती अति दक्षता विभागात असून इतरांच्या प्रकृतीमध्ये समाधानकारक सुधारणा होत असल्याचे लोढा यांनी सांगितले.

सदर जाहिरातीचे मोठे होर्डिंग हे पेट्रोल पंपाजवळ अनधिकृतरित्या बांधण्यात आले होते. महापालिकेने नोटीस बजावून सुद्धा होर्डिंग हटवण्यात आले नाही. त्याचे सेफ्टी ऑडिट किंवा तत्सम प्रक्रिया सुद्धा झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे या घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला पोलीस पकडतील. त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. ही दुर्घटना नसून हत्या आहे, असेही लोढा यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

ई-पीक पाहणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत

0
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेऊन ई-पीक पाहणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून, मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागांत शेतकर्‍यांना ऑफलाइन पद्धतीनेही ई-पीक पाहणी करता...