Thursday, May 2, 2024
Homeनगरअटलबिहारी वाजपेयी सर्कल कामाचे टेंडर अखेर रद्द

अटलबिहारी वाजपेयी सर्कल कामाचे टेंडर अखेर रद्द

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयलँड भोवती चैनलिंक कंपाउंड व सुशोभिकरणाची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी संबंधीत अधिकार्‍याला नोटीस पाठवून खुलासा मागवण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमून 15 दिवसात चौकशी पूर्ण करून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे लेखी पत्र मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिल्याने माजी नगरसेवक संजय छल्लारे व माजी नगरसेविका मिरा रितेश रोटे यांनी आज दि. 1 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणारे उपोषण स्थगित केले आहे.

- Advertisement -

अटलबिहारी वाजपेयी सर्कल तयार करण्याच्या नावाखाली काढलेले बोगस टेंडर रद्द करावे. व त्याच ठिकाणी अटलबिहारी वाजपेयी यांचा अर्धकृती पुतळा बसवावा. भुखंड क्र. 1025 मधील बेकायदेशीर काम करणार्‍या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, त्या सर्व एजन्सीला काळ्या यादीत टाकावे व त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अन्यथा 1 मे 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा छल्लारे व मिराताई रोटे यांनी दिला होता. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यात लक्ष घालण्याबाबत प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांना सुचविले होते.

अटलबिहारी वाजपेयी सर्कल करण्यासाठी 17 लाख 06, हजार 146 रुपये खर्चाचे टेंडर प्रसिद्ध केले. त्या कामास हरकत घेतली, कारण श्रीरामपूर परिषदेमधील भुखंडावर 23 जून 2020 रोजी सर्वसाधारण सभेमध्ये किरकोळ काम सुचविले व ते सभेत मंजुर करून घेतले. दि. 04 सप्टेंबर2020 रोजी काम करण्याचे सांगून सदरचे काम तात्काळ चालु करावे, असा आदेश दिला. तदनंतर तेथेच अटलबिहारी वाजपेयी सर्कल या नावाने त्याच कामाचे परत ऑनलाईन टेंडर मागिवले. सदर ठेकेदाराकडून जवळपास 10 लाख रुपयाची किरकोळ कामे करून घेतली.

ती कामे पूर्ण झाली. अभियंता यांच्या सुचनेनुसार मे. व्यंकटेश कन्सट्रक्शन्स, श्रीरामपूर, के. जी. पाटुले, सावेडी, मे. प्रशांत गोलार, कुकाणा या तीन एजन्सीला दि. 09 नोव्हेंबर 2021 रोजी आपल्या स्वखर्चाने दाखले दिले. पण त्याआधी त्या जागेवर सदरचे कामे झालेली होती. सदर कामे जवळपास 10 ते 12 लाखाचे काम पुर्ण झाले होते पण 6 महिन्यानंतर त्याच कामाचे टेंडर काढून जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली. तेथील नगरपालिकेच्या प्रापर्टी, वस्तूची चोरी होत आहे हे निर्दशनास आणून देत त्या लोकांवर चोरीचा गुन्हा दाखल करावा, असा आग्रह धरला असता आपण दुर्लक्ष केले. त्यामुळे 10 ते 12 लाखाचे मटेरियेल तेथून चोरीला गेल्याचे छल्लारे व रोटे यांनी म्हटले होते.

सदरील कामाची निविदा रद्द करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात जबाबदार अधिकार्‍याचा खुलासा मागवण्यात आला असून खुलासा प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच याप्रकरणी चौकशी समिती नेमून 15 दिवसात चौकशी पूर्ण करणेबाबत आदेशीत करण्यात आले आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कार्यवाही करणेत येईल. अटलबिहारी वाजपेयी यांचा अर्धाकृती पुतळा बसविणेकामी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदर विषय सादर करणेत येईल व सभेच्या आदेशानुसार व निर्णयानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करणेत येईल, त्यामुळे आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू नये, असे लेखी पत्र मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणारे उपोषण स्थगित केल्याचे माजी नगरसेवक संजय छल्लारे व माजी नगरसेविका मिरा रितेश रोटे यांनी सांगितले. 15 दिवसांत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या