Monday, November 16, 2026
Homeक्राईमCrime News : अत्याचारातून जन्मलेल्या अर्भकाला रस्त्यावर टाकले

Crime News : अत्याचारातून जन्मलेल्या अर्भकाला रस्त्यावर टाकले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बाराबाभळी (ता. अहिल्यानगर) शिवारातील बायपास रस्त्यालगत नवजात अर्भक बेवारस अवस्थेत आढळून आल्याच्या प्रकरणाचा भिंगार कॅम्प पोलिसांनी छडा लावला आहे. पीडित तरूणीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.

- Advertisement -

8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास बाराबाभळी शिवारातील बायपास रस्त्यालगत एका बाभळीच्या झाडाखाली अंदाजे एक ते दोन दिवसांचे नवजात पुरूष जातीचे अर्भक बेवारस अवस्थेत आढळून आले होते. या घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान या घटनेमागील धक्कादायक वास्तव समोर आले. एका संशयित आरोपीने पीडित तरूणीवर जबरदस्तीने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

या अत्याचारातून जन्मलेल्या नवजात अर्भकाला बायपास रस्त्याच्या कडेला सोडून देण्यात आले होते. अर्भकाला तेथे टाकून देण्याच्या प्रकारात अन्य आरोपींचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी किरण विश्वनाथ वाघमारे (वय 24), 36 वर्षीय तरूणी आणि इरफान मिकन शेख (वय 51) या तिघांना अटक केली आहे. संशयित आरोपी किरण वाघमारे याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच पीडित तरूणी आणि नवजात अर्भकाचे डीएनए नमुने संकलित करून पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

नवजात अर्भकाला रस्त्याच्या कडेला टाकून देण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार, सुहास आव्हाड, अंमलदार रवी टकले, दिलीप शिंदे, कैलास सायंबर, रेखा पुंड, रामनाथ डोळे, प्रमोद लहारे, कांतीलाल चव्हाण, सतीश भांड, अरूण सांगळे यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

प्रवासादरम्यान दागिने चोरणार्‍या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar बसस्थानकावर बसमध्ये चढताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरणार्‍या महिलांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी...