Friday, September 20, 2024
Homeजळगावमहिला अत्याचार अक्षम्य पाप ; दोषींना सोडू नका - पंतप्रधान नरेंद्र मोदी

महिला अत्याचार अक्षम्य पाप ; दोषींना सोडू नका – पंतप्रधान नरेंद्र मोदी

जळगाव – प्रतिनिधी

- Advertisement -

महिलांची सुरक्षा हि देशाची प्राथमिकता आहे. महिलांवरील अत्याचार हे अक्षम्य पाप असुन हे पाप करणारा कुठलाही दोषी वाचला नाहि पाहिजे. शाळा, ऑफिस, पोलीस ठाणे कोणताहि स्तर असो निष्काळजीपणा खपवुन घेणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी झालेल्या लखपती दीदी संमेलनात दिला. दरम्यान सरकारे येतील आणि जातीलहि महिलांची सुरक्षा हि मोठी जबाबदारी असल्याचेहि ते म्हणाले.


जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित लखपती दीदी समेलनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री पेम्मास्वामी, प्रतापराव जाधव, कमलेश पासवान, रक्षा खडसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आ राजुमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ संजय सावकारे, आ श्वेता महाले, आ किशोर पाटील, आ लता सोनवणे उपस्थित होते

- Advertisment -

ताज्या बातम्या