Sunday, October 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकांदा खरेदीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, आजपासून 'या' दराने खरेदी सुरु

कांदा खरेदीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, आजपासून ‘या’ दराने खरेदी सुरु

सातारा | Satara
राज्यातील कृषी मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून दर मात्र कमीच आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचं दिसून येत आहे. दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. या दरम्यान हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकार आता थेट कांदा खरेदी करणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मंत्री आणि साताऱ्याचे पालक मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कांदा खरेदीची घोषणा केली.

- Advertisement -

मुख्यमंत्री कांदा खरेदीबाबत काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, कांदा शेतकऱ्यांच्या दुरवस्थेबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे कांदा खरेदी करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर आता १२३५ रुपयांनी कांद्याची खरेदी सुरू करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. काही दिवसांपूर्वी मंत्रालयाबाहेर कांद्याच्या दरावरून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयासमोर कांदा फेकून रोष व्यक्त केला होता.

शिवसेना चिन्ह आणि पक्षाच्या सुनावणीत कोर्टानं ठाकरे गटाला फटकारलं; म्हणाले, न्यायालयाच्या कामकाजाबाबत…

पुढे बोलताना फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळूनऊस कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या संकट राज्य सरकार दूर करेल असा शब्द देतो. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना पोहोच राशी सुद्धा सरकारच्या माध्यमातून देणार आहोत अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

यावेळी बोलताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी म्हटले की, भारतात नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र दोन्हीकडे कमळ उगवले आहे. प्रत्येक गरिबाला पक्के घर दिले जाईल हा पंतप्रधानांचा मानस आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याच राज्याला 30 लाख खरं मिळाली नव्हती, मात्र महाराष्ट्राला 30 लाख घर मिळाले आहेत असं सांगताना कांद्याची खरेदी 12 रुपये 35 पैसे किमतीने सुरू केली जाईल अशी माहिती दिली आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार...