मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची काल (शनिवार) रात्री चार जणांनी गोळ्या घालून हत्या केली. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddiqui) यांच्या कार्यालयासमोरच त्यांच्यावर हा गोळीबार (Firing) करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघांचा तपास सुरु आहे. यानंतर आज अटक केलेल्या आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते.
हे देखील वाचा : बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात; आरोपींची नावे आली समोर
यातील धर्मराज राजेश कश्यप (वय १९) या आरोपीची वयाची चाचणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर गुरमैल बलजीत सिंह (वय २३) याला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. तसेच यातील दोन आरोपी (Accused) अद्यापही फरार आहेत. शिवकुमार गौतम उर्फ शिवा (२०) आणि मोहम्मद झीशन अख्तर, असे या आरोपींची नावे आहेत. यात मोहम्मद झीशन अख्तर यानेच हत्येसाठी (Murder) हत्यार पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे.
हे देखील वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या
यावेळी युक्तिवाद करताना सरकारी वकील न्यायालयात (Court) म्हणाले की, आरोपींना घटनस्थळावरून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आम्हाला आधार कार्ड सापडले. त्यात धर्मराज कश्यपचे वय १९ आहे. आरोपींकडे काही पुरावे नाही. प्रथमदर्शनी त्याचे वय १९ दिसत असून खोटं आधार कार्ड देखील आरोपींनी बनवले असू शकते. यावर आपली बाजू मांडताना बचाव पक्षाचे वकील म्हणाले की, जर आधार कार्ड खोटं आहे तर पोलिसांनी तसे पुरावे सादर करावे. यानंतर न्यायालयाने कश्यपचे जन्माचा दाखला दाखवण्यास सांगितले आहे. यावर बचाव पक्षाचे वकील म्हणाले की, जन्माचा दाखल आता नाही, मात्र आरोपी वयाची चाचणी करण्यास तयार आहे, असे म्हटले.
हे देखील वाचा : बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली
त्यानंतर सरकारी वकिलांनी दोन्ही आरोपींची १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली.यावेळी सरकारी वकील म्हणाले की,”ज्यांची हत्या झाली ती सामान्य व्यक्ती नसून राज्यमंत्री राहिलेले आहेत. आरोपी उत्तरप्रदेश आणि हरियाणामधून आले होते. ते पुणे आणि मुंबईत राहिले होते. आरोपींनी रेकी केलेली आहे. आरोपींना स्थानिक पातळीवर मदत करणारे कोण, त्यांना सगळे साहित्य पुरवणारे कोण? याचा तपास करायचा आहे”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
हे देखील वाचा : Sanjay Raut on Baba Siddique : “गृहमंत्र्यांचा राजीनामा नको, आता त्यांना थेट…”; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर संजय राऊत फडणवीसांवर संतापले
तसेच यावेळी आरोपींकडे तब्बल २८ जिवंत काडतुसे सापडल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. आरोपी ही हत्या करून शांत बसणार होते की आणखी कोणाची हत्या करायची होती हे तपासायचे आहे.असून दोन आरोपी फरार आहेत, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा तपास करावा लागणार आहे. आम्हाला अनेक बाबी तपासायच्या आहेत. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. आणखी कोण यांच्या निशाण्यावर आहेत का हे तपासायचे आहे. आरोपीना बंदूक पुरवणारे कोण आहेत, त्यांना फंडिंग कोणी केलेली आहे हे आम्हाला तपासायचे आहे, असा युक्तिवादही सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.
हे देखील वाचा : केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून…; बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी सरकारला सुनावले खडेबोल
तपासासाठी १० टीम तयार करण्यात आल्या आहेत
यावेळी युक्तिवाद करताना बचाव पक्षाचे वकील म्हणाले की, “यांनीच गुन्हा केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणत्या आरोपीकडून बंदूक जप्त केली आहेत? कॅश काही जप्त केली आहे? याचा कसलाही उल्लेख रिमांड कॉपीमध्ये नाही. कमीत कमी कोठडी द्यावी, ही आमची मागणी आहे. यानंतर सरकारी वकील म्हणाले की, १० टीम तयार करण्यात आल्या आहेत. पुण्याला काय करत होते, कुठे राहत होते, याचा सगळ्याचा तपास करायचा आहे. प्लॅन अगदी अचूक पद्धतीने तडीस नेला,असे म्हटले. यावेळी सरकारी पक्षाने कश्यपचे आधार कार्ड न्यायालयात सादर केले असता त्यात त्याचा जन्म १ मार्च २००३ चा असल्याचे लिहिले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा