जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन 2021-22 च्या 305.17 कोटी रूपयांचा अर्थसंकल्पाला मंगळवारीअधिसभेच्या ऑनलाईन बैठकीत मान्यता देण्यात आली. या अर्थसंकल्पात 37.61 कोटी रुपयांची तुट दर्शविण्यात आली आहे. प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक झाली.
व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा झाली. या चर्चेत प्रा.गौतम कुवर, प्राचार्य आर.एस.पाटील, प्राचार्य ए.टी.पाटील, प्राचार्य लता मोरे, जी.वाय.पाटील, दिनेश नाईक, प्राचार्य अशोक राणे, प्राचार्य पी.पी.छाजेड, दिनेश खरात, प्राचार्य अशोक खैरनार, सुरेश पवार, प्राचार्य अनिल लोहार,डॉ.प्रशांत सरोदे, अमोल मराठे, डी.पी.नाथे, प्रा.एस.आर. चौधरी, नितीन ठाकूर, मनिषा खडके, प्रा.एकनाथ नेहेते, प्रा.सुनील गोसावी तसेच विष्णू भंगाळे यांनी भाग घेतला.
प्रा.गौतम कुवर व विष्णू भंगाळे व नितीन ठाकूर यांनी काही सूचना या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने केल्या. सदस्यांच्या शकांचे प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल यांनी निरसन केले.
सभेच्या सुरवातीला काही अभिनंदनाचे ठराव मांडण्यात आले. विषयपत्रिकेतील लेखापरिक्षण अहवालाच्या अनुषंगाने प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांनी समिती नियुक्त करून आक्षेपांची पुर्तता करून अधिसभेसमोर हा अहवाल पुन्हा मांडला जाईल असे सांगितले. प्रश्नोत्तरांचा तास तहकुब करण्यात आला. बैठकीस प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार उपस्थित होते.सदस्य सचिव तथा प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर यांनी सुत्रसंचालन केले.
या सभेत प्राचार्य आर.एस.पाटील, प्रा.डॉ.पी.पी.छाजेड, प्राचार्य अशोक राणे, बी.पी.पाटील, एस.आर.गोहिल, डी.पी.नाथे, डॉ.अनील चिकाटे, प्रा.पंकजकुमार नन्नवरे, डॉ.दिनेश पाटील, प्रा.मनिष जोशी, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य ए.पी.खैरनार, प्राचार्य ए.टी.पाटील, प्राचार्य लता मोरे, प्राचार्य नाना गायकवाड, प्राचार्य डॉ. अनील लोहार, प्राचार्य मिनाक्षी वायकोळे, प्राचार्य राजू फालक, अॅड.संदीप पाटील, प्रा.अनिल पाटील, प्रा. प्रकाश अहिरराव, प्रा.एकनाथ नेहेते, प्रा.गौतम कुवर, प्रा.मोहन पावरा, प्रा.सुनील गोसावी, प्रा.किशोर कोल्हे, प्रा.संध्या सोनवणे, प्रा.भुषण चौधरी, प्रा.अजय सुरवाडे, प्रा.मधुलिका सोनवणे, विष्णू भंगाळे, अमोल मराठे, अमोल सोनवणे, दिनेश नाईक, दिनेश खरात, नितिन ठाकूर, विवेक लोहार, मनिषा चौधरी, डॉ.प्रशांत सरोदे, प्रकाश पाठक, सुरेश पवार, राजेंद्र दहातोंडे, गिरीष पाटील, जी.वाय.पाटील, भुपेंद्र गुजराथी आदी उपस्थित होते.
अर्थसंकल्पात अशी आहे तरतूद
ऑनलाईन अधिसभेच्या बैठकीत व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक बंडू पाटील यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. दि.25 मार्च रोजी अधिसभेची बैठक तहकुब झाली होती. ती बैठक आज घेण्यात आली. विकासाला चालना देणार्या या अर्थसंकल्पात नव्याने सुरू करण्यात येणार्या कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कारासाठी 25 लाख, स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्षासाठी 25 लाख तसेच नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी बहूल मोलगी येथे विद्यापीठ संचलित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासाठी 40 लाखाची तरतूद हे या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.
अर्थसंकल्पात परिरक्षणासाठी 201.58 कोटी रूपये, योजनांतर्गत विकासासाठी 62.33 कोटी आणि विशेष कार्यक्रमांसाठी/ योजनांसाठी 51.26 कोटी अशी एकूण खर्चासाठी 305.17 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पात उत्पन्नासाठी तरतूद 267.56 कोटी इतकी असल्यामुळे रूपये 37.61 कोटी इतक्या तुटीचा हा अर्थसंकल्प आहे. खर्चात बचत करून ही तुट भरून काढण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विकासाला चालना देणारा असा हा अर्थसंकल्प आहे.




