नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आध्यात्मिक मुखवटा ओढून वासनांध आणि आर्थिक लुटालूट करणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) या भोंदूवर अवघ्या १८ दिवसांत तब्बल डझनभर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एका कांदा व्यापायाला तब्बल ८५ लाखांचा गंडा (Fraud) घातल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला असून, या प्रकरणात भोंदू खरातने चक्क १५ हजार रुपयांना दिलेला ‘मंतरलेला खडा’ हा साधा चिंचोका निघाल्याचे समोर आले आहे. तसेच, पैशांसाठी अन् जागेसाठी तगादा लावू नकोस, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल असेही धमकावले.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!
सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) नांदूर शिंगोटे येथील कांदा व्यापारी विशाल सूर्यभान बर्के आणि खरातची ओळख २०१४ मध्ये एका ब्रोकरमार्फत झाली होती. व्यापाऱ्याने आर्थिक विवंचनेपोटी पाथर्डी ते गौळाणे परिसरातील ६०० वार जमीन विक्रीला काढली होती. खरातने आपण ‘देवाचा अवतार’ असल्याचे भासवत आणि वृद्धाश्रम उभारण्याचे खोटे स्वप्न दाखवून ६५ लाख रुपये किमतीची जमीन अवघ्या २० लाखांत लाटली. विशेष म्हणजे, ही जमीन त्याने स्वतःच्या मुलगी तृप्तबालाच्या नावावर करून घेतली, जिथे आजतागायत वृद्धाश्रमाची एक वीटही रचलेली नाही.
हे देखील वाचा : Nashik Crime News : लोंढे पिता-पुत्रांना दणका; महासंचालक कार्यालयाकडून ‘मोक्का’ मंजूर, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
खरातचा लोभ एवढ्यावरच थांबला नाही. त्याने संबंधित व्यापाऱ्याला (Trader) चांगला प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी ८५ लाख रुपये उकळले. जेव्हा व्यापाऱ्याने जमिनीचा व्यवहार किंवा पैसे परत करण्याची मागणी केली, तेव्हा खरातने आपले खरे रूप दाखवले. ‘मी देवाचा माणूस आहे, पैसे परत मागितले तर देवाचा कोप होईल,’ अशी धमकी देत त्याने व्यापाऱ्याला मानसिक दबावाखाली ठेवले. धंद्यात प्रगती व्हावी म्हणून खरातने व्यापाऱ्याकडून १५ हजार रुपये उकळले आणि एक ‘मंतरलेला खडा’ गळ्यात घालण्यास दिला. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तपास केला असता, तो मंतरलेला खडा दुसरा तिसरा काही नसून चक्क एक ‘चिंचोका’ असल्याचे समोर आले आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सातपूरला ‘खरात फाईल्स’ची पुनरावृत्ती! लैंगिक शोषण प्रकरणी रवींद्र एरंडेला बेड्या
गुन्ह्यांचे ‘डबल डझन’ होण्याच्या मार्गावर?
सरकारवाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. ३) रात्री याप्रकरणी खरातविरुद्ध नवा गुन्हा दाखल करण्यात आला. खरातवर आतापर्यंत नोंदवलेल्या १२ गुन्ह्यांपैकी ८ गुन्हे हे महिलांच्या लैंगिक शोषणाचे आहेत, तर ४ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : न्यूड व्हिडीओ स्कँडलचा मास्टरमाईंड एरंडेला कोठडी
एसआयटीचे मौनव्रत
आतापर्यंत खरातविरुद्ध १२ गंभीर गुन्हे दाखल झाले असून, त्यात ८ लैंगिक अत्याचार, सावकारी, खंडणी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. मात्र, या प्रकरणांचा तपास करण्यासाठी स्थापन विशेष तपास पथकाने (एसआयटी) धारण केलेले कमालीचे ‘मौनव्रत’ आता चर्चेचा विषय ठरत आहे.
हे देखील वाचा : Nashik Dindori Accident News : मंत्री महाजन, भुसे, झिरवाळ यांच्यासह खासदार भगरेंकडून घटनास्थळाची पाहणी





