Monday, October 5, 2026
Homeनगरबँकेत तारण ठेवलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री

बँकेत तारण ठेवलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री

भन्साळीला चार दिवस पोलीस कोठडी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सुमारे 291 कोटी रूपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला चार दिवसांची (9 जून पर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रूपेश सूर्यकांत भन्साळी (वय 49, रा. स्वारगेट, पुणे) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, गगन बिल्डस्केपच्या भागीदारांनी कर्जासाठी बँकेत तारण ठेवलेल्या 54 पैकी 14 फ्लॅटची परस्पर विक्री केल्याचे व या प्रकरणी पुण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

रूपेश सूर्यकांत भन्साळी हा गगन बिल्डस्केप या फर्मचा भागीदार असून त्याने इतर भागीदारांसह फर्मच्या नावे नगर अर्बन बँकेतून सन 2019 मध्ये 9.75 कोटी व 25 लाख रुपये असे एकूण 10 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. सदरचे कर्ज हे गगन केसकड या प्रोजेक्टसाठी घेतले होते. मात्र, त्यासाठी रक्कम न वापरता इतर खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली. तारण 54 फ्लॅट पैकी 14 फ्लॅटची बँकेची परवानगी न घेता परस्पर विक्री केली.

त्यांच्याकडे व्याजासह 16.11 कोटी रुपये थकीत आहेत. त्यांनी इतर खात्यात वर्ग केलेल्या रकमा हस्तगत करायच्या आहेत, तसेच, त्यांनी बँकेचे संचालक व अधिकारी यांना काही रक्कम दिली का, रकमेचा काय विनीयोग केला, याची चौकशी करायची असल्याने सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने 9 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला मिळतोय हा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 375 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 3963 क्रेटस् ची...