Sunday, October 18, 2026
HomeनगरRahuri : बारागाव नांदूर येथे मुळा नदीपात्रात अवैध वाळूसाठा जप्त

Rahuri : बारागाव नांदूर येथे मुळा नदीपात्रात अवैध वाळूसाठा जप्त

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी पोलीस पथकाने काल सकाळच्या सुमारास तालुक्यातील बारागांव नांदूर परिसरात धडाकेबाज कारवाई करून तब्बल 30 ब्रास वाळूसाठा व एक चप्पू जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. राहुरी पोलिसांना मिळालेल्या खबरीवरून पथकाने काल 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ताक्यातील बारागाव नांदूर परिसरातील मुळा नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली.

- Advertisement -

त्यानुसार राहुरी पोलिस पथकाने छापा टाकून अज्ञात वाळू तस्करांनी उपसा केलेली 3 लाख रुपये किंमतीची 30 ब्रास वाळू व 45 हजार रुपये किमतीचा चप्पू असा एकूण 3 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्या आदेशानुसार बारागांव नांदूर येथील मंडळ अधिकारी श्रीमती मरकड यांच्या ताब्यात मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी देण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास वैराळ, पोलीस नाईक गणेश सानप, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास गीते व सागर नवले आदींच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Maharashtra Weather Update : पाऊस पुन्हा परतला! राज्यातील दहा जिल्ह्यांना IMD...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑक्टोबर हिटचा (October Hit) चटका चांगलाच जाणवत आहे. यामुळे मुंबई, पुणे आणि नाशिकसह महाराष्ट्रातील (Maharashtra) इतर जिल्ह्यांत उकाडा...