Sunday, October 18, 2026
Homeमहाराष्ट्रBaramati News : बारामतीत खळबळ! रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

Baramati News : बारामतीत खळबळ! रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

बारामती । Baramati

बारामती शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या अवघ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. घराजवळच या बालिकेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण बारामती परिसरासह राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या, याबाबतचे गूढ वाढले असून पोलीस सर्व बाजूंनी या घटनेचा तपास करत आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री आई आणि १२ वर्षीय मुलीमध्ये एका किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या किरकोळ भांडणानंतर मुलगी रागाच्या भरात कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली. मुलगी अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, रात्रभर शोध घेऊनही ती सापडली नाही, ज्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता (मिसिंग) असल्याची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शोध मोहीम सुरू केली होती. मात्र, सकाळी बारामतीतील रुई येथील साई गणेश नगर भागात, घराजवळच या चिमुकलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेचे पथक (Forensic Team) देखील रुई येथील साई गणेश नगर परिसरात दाखल झाले आहे. फॉरेन्सिक टीमकडून संपूर्ण परिसराची बारीक पाहणी केली जात असून, घटनास्थळावरून आवश्यक पुरावे आणि नमुने गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, आपल्या पीएच्या १२ वर्षीय मुलीचा असा दुर्दैवी आणि संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करत तातडीने बारामतीकडे धाव घेतली आहे. ते थोड्याच वेळात बारामतीत दाखल होऊन दशावतारे कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

आईसोबत झालेल्या किरकोळ वादामुळे मुलीने टोकाचे पाऊल उचलले की तिच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक दृष्ट्या हा मृत्यू अत्यंत संशयास्पद मानला जात आहे. मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-Mortem) झाल्यानंतर आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस सध्या परिसरातील सर्व संभाव्य प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत असून या दुर्दैवी घटनेमागील सत्य शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...