Wednesday, November 18, 2026
Homeक्राईमCrime News : चौघांची एकमेकांना पोलिसांसमोरच मारहाण

Crime News : चौघांची एकमेकांना पोलिसांसमोरच मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातच चार जणांनी एकमेकांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (16 नोव्हेंबर) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडला. पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू असलेला हा राडा पाहून पोलिसांनी मध्यस्थी करीत चौघांची भांडणे सोडवली. याप्रकरणी चौघांविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नामदेव माधव हराळे (वय 55), केतन नामदेव हराळे, निखील नामदेव हराळे (तिघे रा. पाईपलाईन रोड, सावेडी) आणि राहुल सुनील शिंदे (रा. बुर्‍हानगर रोड, नागरदेवळे, ता. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस अंमलदार वैभव मच्छिंद्र झिने यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी दुपारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचारी दैनंदिन कामकाज करीत होते.

त्यावेळी पोलीस ठाण्याच्या अंमलदार कक्षाबाहेर आरडाओरड सुरू झाल्याचा आवाज आला. त्यामुळे पोलीस अंमलदार झिने यांच्यासह अंमलदार मिसाळ, अजय गव्हाणे, रवींद्र टकले, महिला पोलीस अंमलदार साळवे यांनी बाहेर जाऊन पाहिले असता, वरील चौघे एकमेकांना शिवीगाळ करीत झटापट करताना दिसले. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी करून त्यांची भांडणे सोडवली. त्यानंतर चौघांची नावे व पत्ते विचारून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार बी. एस. म्हस्के करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : टंचाईचे संकट; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला दोन महिने बंदी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे चारा साठा कमी होत असल्याने पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणारा...