बीड । Beed
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडमधील गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरला आहे का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवाय मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून तसंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून बीडमधील काही लोकांची हातात बंदूक घेतल्याचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत. त्यांच्या ट्विटनंतर पोलिसांनी फोटोतील व्यक्तींना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडमध्ये हे सर्व सुरू असतानाच बीडच्या परळीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. परळीमध्ये पुन्हा एकदा हवेत गोळीबार केल्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहे. या प्रकरणी परळी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
परळी तालुक्यात हवेत गोळीबार करतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या प्रकऱणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच एकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता परळी ग्रामीण पोलिसांनी आणखी तीन जणांवर गुन्हे दाखल केल्यची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे हवेत गोळीबार करणाऱ्यांनीच त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच, ज्या ज्या नेत्यांची आणि धनदांडग्यांची बंदुकी-पिस्तुले दाखवीत छायाचित्रे आहेत त्या सर्वांचे शस्त्र परवांनेही रद्द करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.