Wednesday, November 25, 2026
HomeनगरAhilyanagar : शिक्षकांकडून दंडमाफीची मागणी

Ahilyanagar : शिक्षकांकडून दंडमाफीची मागणी

शैक्षणिक संस्थांमध्ये संभ्रम अवस्था

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यातील ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेत झालेल्या सुमारे 18 हजार प्रवेशांच्या प्रकरणात प्रति विद्यार्थी 5 हजार रुपये दंड आकारण्याच्या शिक्षण संचालनालयाच्या आदेशामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या दंडाची एकूण रक्कम 9 कोटी रुपये होत असल्याने हा दंड नेमका प्रति संस्था आकारायचा की प्रति विद्यार्थी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे प्रति विद्यार्थी आकारण्यात येणारा 5 हजार रुपयांचा दंड माफ करावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.

- Advertisement -

शालेय शिक्षण विभागाच्या 17 मार्च 2021 च्या शासनपत्रानुसार, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी परवानगी नसताना प्रवेश दिल्याबद्दल संबंधित संस्थेकडून 5 हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश होते. तसेच हा दंड विद्यार्थ्यांकडून वसूल करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, शिक्षण संचालक (माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या आदेशात ऑफलाईन प्रवेश दिलेल्या शाळा व महाविद्यालयांकडून प्रति विद्यार्थी 5 हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिल्याने दोन्ही आदेशांमधील फरकामुळे शैक्षणिक क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या मूळ आदेशात प्रति संस्था 5 हजार रुपये दंडाचा उल्लेख असताना संचालनालयाने प्रति विद्यार्थी दंड आकारण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्या

Parner : पारनेर पोलिसांची वाळूतस्करावर कारवाई

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner पारनेर पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करत विनानंबरच्या टाटा डंपरसह सुमारे 15 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या...