Tuesday, November 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपंचवटीतील महात्मा गांधी तलावाचे नामांतर नको; ऐतिहासिक वारसा जतन करा – कॉ....

पंचवटीतील महात्मा गांधी तलावाचे नामांतर नको; ऐतिहासिक वारसा जतन करा – कॉ. राजू देसले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

शहराच्या मध्यवर्ती भागातील गांधी तलावाचे नाव बदलण्याचा प्रयत्न हा नाशिकच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाशी छेडछाड करणारा आहे. गांधीजींचे नाव बदलल्याने त्यांचे विचार आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान पुसले जाणार नाही. त्यामुळे गांधी तलावाचे नाव कायम ठेवावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉम्रेड राजू देसले यांनी केली आहे.

महात्मा गांधी यांच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडात विसर्जन करण्यात आले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तलाव परिसरात संगमरवरी स्मारक उभारण्यात आले आणि त्यानंतर या परिसराला गांधी तलाव अशी ओळख मिळाली. त्यामुळे हे नाव नाशिकच्या राष्ट्रीय आणि ऐतिहासिक स्मृतीशी जोडलेले असल्याचे देसले यांनी म्हटले आहे. नामांतराच्या राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य द्या, असे आवाहन करत देसले म्हणाले की, गांधी तलावाची स्वच्छता, सुशोभीकरण आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी प्रशासनाने निधी व मनुष्यबळ खर्च करावे.

इतिहास पुसून नवीन इतिहास निर्माण करता येत नाही. कुंभमेळ्यात पर्यटनाला चालना द्यावी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गांधी तलावाच्या सुशोभीकरणाची संधी साधून त्याची ऐतिहासिक ओळख अधिक ठळक करावी. गांधीजींच्या स्मारकाची माहिती, तलावाचा इतिहास आणि नाशिकशी असलेले गांधीजींचे नाते सांगणारे माहिती फलक उभारावेत. परिसरात स्वच्छता, आकर्षक सुशोभीकरण आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

कुंभमेळ्यासाठी देशभरातून आणि परदेशातून लाखो भाविक व पर्यटक नाशिकमध्ये येणार आहेत. गांधी तलावाचा इतिहास पर्यटकांसमोर प्रभावीपणे मांडल्यास शहराच्या पर्यटनाला चालना मिळू शकते. त्यामुळे नाशिक महानगरपालिका आणि कुंभमेळा प्राधिकरणाने गांधी तलावाचे नाव कायम ठेवून त्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी नियोजनबद्ध कृती करावी, अशी मागणी कॉम्रेड राजू देसले यांनी केली.

ताज्या बातम्या

पेपरफुटीविरोधी कायदा अधिक कठोर करण्याची शिफारस; उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल सादर

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai सरकारी नोकरभरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पेपरफुटीच्या विरोधातील कायदा अधिक कठोर करावा. संघटित परीक्षा गैरप्रकारांत सहभागी व्यक्ती आणि...