Monday, May 4, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरा, मुळा धरणातील पाणीसाठा 75 टक्क्यांवर

Bhandardara : भंडारदरा, मुळा धरणातील पाणीसाठा 75 टक्क्यांवर

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेती, उद्योग, गावगावच्या पाणीयोजनासाठी लाभदायक ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा धरणातील पाणीसाठा 75 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन्हीही धरणात पाणीसाठा मुबलक आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 131 दलघफू पाण्याची आवक झाल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात सध्या 8440 दलघफू (76.46 टक्के) पाणीसाठा आहे.

- Advertisement -

निळवंडेतही धीम्या गतीने आवक सुरू असून पाणीसाठा 7253 दलघफू (87.18 टक्के) होता.पाणलोटात पावसाचे प्रमाण अल्प असलेतरी होत असलेल्या आवकेमुळे मुळा धरणात 19387 दलघफू (74.57 टक्के) पाणीसाठा आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ४ मे २०२६ – राजधर्माची कठोर परीक्षा!

0
पुणे जिल्ह्याच्या मातीत आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीत अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन घटनांनी माणुसकीची मान शरमेने झुकली. नसरापूरमध्ये एका ६५ वर्षीय नराधमाने चार...