Sunday, May 24, 2026
HomeनगरBhandardara : काजव्यांची मायानगरी पर्यटकांच्या गर्दीने गजबजली!

Bhandardara : काजव्यांची मायानगरी पर्यटकांच्या गर्दीने गजबजली!

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

काजव्यांची मायानगरी म्हणून प्रसिद्ध असणार्‍या भंडारदरा, कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजव्यांना बहर आला असून हजारो पर्यटक काजव्यांचा चकाकण्याचा करिष्मा बघण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण पाणलोटक्षेत्रामध्ये असणारे कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य म्हणजे काजव्यांचे माहेरघर समजले जाते. याच माहेरघरात मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कोट्यवधींच्या स्वरूपात अनेक झाडे काजव्यांनी लगडलेली दिसून येतात.

- Advertisement -

काजव्यांचा हा प्रजनन काळ असून नर मादीला आकर्षित करण्यासाठी चमकत असतो. काजव्यांचा हा चमकण्याचा करिष्मा बघण्यासाठी हजारो पर्यटक भंडारदर्‍याला आवर्जून भेट देत असतात. ग्रीष्म ऋतू संपतो न संपतो तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रूपात धरतीवर अवतरलीय की काय? असा विचार मनात चमकून जातो. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरलंय… इथे रात्रच चांदण्यांची झालीय असा आभास, काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्रीच्या प्रकाशाचा अद्भूत खेळ तासनतास पाहत बसलो तरी मन काही त्रुप्त होत नाही.

असा हा काजव्यांचा अमाप महिमा असलेला सोहळा पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड अभयारण्यात पाहायला मिळते आहे. यावर्षी भंडारदर्‍याला प्रचंड उष्णता असल्याकारणाने काजव्यांची उशिरा हजेरी लागली. त्यामुळे अगोदरच काजवे बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशा आली. मात्र दोन दिवसापूर्वी भंडारदर्‍याच्या वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला आणि निसर्गात काजव्यांचा मुक्त संचार दिसायला लागला. हिरडा, सादडा, बेहडा, आंबा, जांभुळ या झाडांवर काजव्यांचा मुक्त संचार सुरू आहे.

दरम्यान, पर्यटकांची गर्दी बघता वन विभाग मात्र सतर्क झाला असून काजवे बघण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना त्यांच्याकडून काजव्यांना कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेत अभयारण्यात सोडत आहेत. अभयारण्यामध्ये गाड्यांच्या प्रकाशाचा काजव्यांवर परिणाम होणार नाही याचीही दक्षता घेण्याचा प्रयत्न वन्यजीव विभागाने केलेला दिसतोय. ठिकठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले असून याठिकाणावरूनच काजवे बघण्यासाठी पर्यटकांना पायी प्रवास करावा लागतोय.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आचारसंहिता लागू नसल्याने होणार कर्मचार्‍यांच्या बदल्या!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे तात्पुरत्या स्थगित केलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांना पुन्हा एकदा संमती मिळाल्याने सोमवारी (दि. 25) या बदल्या होत आहेत. दरम्यान,...