Wednesday, June 10, 2026
HomeनगरBhandardara rainfall update : भंडारदरात पुन्हा पाऊस सुरू

Bhandardara rainfall update : भंडारदरात पुन्हा पाऊस सुरू

भंडारदरा (वार्ताहर)

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण परिसर आणि पाणलोटात काल रविवारी दिवसभर अधूनमधून पाऊस कोसळत होता. त्यामुळे डोंगरदऱ्यावरील धबधबे पुन्हा सक्रीय झाले असून ओढेनाले खळखळू लागले आहेत.

- Advertisement -

दोन दिवसांपासून पाणलोटात पावसाने काढता पाय घेतला होता. पण काल दुपारपासून सरी कोसळत होत्या. सायंकाळपर्यंत अधूनमधून कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत होता.

११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात २७४६ दलघफू (२४.८८ टक्के) पाणीसाठा आहे. निळवंडेत २३६६ दलघफू (२८.४१टक्के) आहे. आढळातील पाणीसाठा ५१.७० टक्के १०६० दलघफू क्षमतेच्या आढळा धरणातील पाणीसाठा ५४८ दलघफू (५१.७० टक्के) झाला होता.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : केंद्रप्रमुख पदाच्या भरतीत पात्र उमेदवारांकडून ‘चाचपणी’

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील केंद्र प्रमुख पदाच्या परीक्षेद्वारे होणार्‍या भरतीसाठी येत्या 11 व 12 जूनला पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पाहणी करण्यात येणार आहे....