Tuesday, April 7, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरा रस्त्यावरील वाहतूक मार्गात तीन दिवस बदल

Bhandardara : भंडारदरा रस्त्यावरील वाहतूक मार्गात तीन दिवस बदल

राजूर |वार्ताहर| Rajur

दरवर्षी पर्यटन पंढरी असणार्‍या भंडारदरा (Bhandardara) परिसरात स्वातंत्र्य दिनाला (Independence Day) मोठी गर्दी होत असते. यंदाही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यांवरील वाहतूक मार्गात स्वातंत्र्य दिनापासून सलग तीन दिवस बदल करण्यात आले आहे. यंदा स्वातंत्र्य दिनापासून सलग तीन दिवस सुट्ट्या (Holidays) आलेल्या आहेत. त्यामुळे गर्दी लक्षात घेता कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge) यांच्या आदेशाने वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केले आहे.

- Advertisement -

राजूर पोलीस हद्दीत भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा, हरिश्चंद्रगड, कळसूबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर रतनवाडी, वाल्मिकत्र्यर्थी आश्रम कोदणी अशी प्रेक्षणीय स्थळे असल्यामुळे स्वातंत्र्य दिनी मोठ्या प्रमाणावर पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई व आसपासच्या तालुक्यांतील संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, इगतपुरी व इतर महत्त्वाच्या शहरांतील पर्यटक यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यातच 15 ऑगस्ट ते दिनांक 17 ऑगस्ट, 2025 अशी सलग 3 दिवस सुट्टी असल्याने वरील ठिकाणी पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सदर भागातील रस्ते हे अरुंद असून काही रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम चालू आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तीन दिवस सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत शेंडी-भंडारदरा येथील वाहतूक एकेरी करणे आवश्यक आहे. त्यानुसार रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद, शेंडी (Shendi) / भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथून प्रवेश ठेवण्यात आला आहे. तर एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा / वाकी फाटा (प्रवेश) चिंचोडी फाटा यश रिसॉर्ट शेंडी / भंडारदरा धरण स्पील्वे गेट – भंडारदरा गाव – गुहिरे रंधा (बाहेर) असा आहे. यामध्ये शासकीय वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना सवलत राहणार आहे.

ताज्या बातम्या

दिंडोरी तालुक्यावर शोककळा : वेगवेगळ्या घटनेत पाच बालकांचा दुदैवी मृत्यू

0
दिंडोरी । प्रतिनिधी Dindori दिंडोरी शहरात नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू होण्यास आज पाच दिवसही पूर्ण होत नाही तोच तालुक्यात पुन्हा एकदा वेगवेगळ्या झालेल्या घटनेत...