Monday, September 28, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरात शनिवारी, रविवारी एकेरी वाहतूक

Bhandardara : भंडारदरात शनिवारी, रविवारी एकेरी वाहतूक

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा धरण परिसरातील बहरलेले सौंदर्य न्याहाळण्यासाठी शनिवार आणि रविवारी सुट्ट्या असल्याने पर्यटकांची प्रचंड गर्दी होणार आहे. पण रस्त्याचे दुरुस्तीचे काम चालु असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता यासाठी पोलिसांनी एकेरी वाहतूक तसेच पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकण कडा, हरिश्चंद्र गड, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी, वाल्मीकऋषी आश्रम कोदणी या प्रेक्षणीय स्थळी पुणे, नाशिक, ठाणे मुंबई व अहिल्यानगर जिल्ह्यातून 15 ऑगष्ट निमीत्त मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. तसेच सलग लागुन येणार्‍या शनिवार व रविवार या सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सदर भागातील रस्ते अरुंद आहेत तसेच काही रस्त्याचे दुरुस्तीचे काम चालु असल्यामुळे मोठ्या प्रमाणात
– रंधा फाटा येथुन भंडारदरा येथे जाणारे वाहतुकीकरीता प्रवेश बंद करण्यात येत असुन सदर मार्गावरील सर्व प्रकारची वाहतेक पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. शेंडी / भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघशी फाटा येथून प्रवेश देण्यात येणार आहे.
– एकेरी वाहतुकीचा मार्ग -वारंघुशी फाटा / वाकी फाटा (प्रवेश) चिचोंडी फाटा यश रिसोर्ट शेंडी भंडारदरा धरण स्पिल्वे गेट – भंडारदरा गाव – गुहीरे रंधा मार्गे इच्छित स्थळी जातील.
– सदर वाहतूक वळविणेबाबतचा आदेश अकोले तालुक्यातील राजुर पो.स्टे. हद्दीत दि. 15 आणि 16 ऑगस्ट 2026 रोजीचे सकाळी 7. ते रात्री 20 वा. पर्यंत जारी राहील.
– हा आदेश शासकीय वाहने, अ‍ॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...